मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपखाली अटक करण्यात आली आहे. सतीश वैद्य असं अटक केलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ज्या महिलेनं वैद्यवर बलात्काराचा आरोप केला आहे, ती पीडित महिलादेखील मनसेची कार्यकर्ता आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वैद्य हा चेंबूरमधील मनसेचा कार्यकर्ता आहे. पीडित महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर एफआयआर दाखल केला. महिलेचा गंभीर आरोप सतीश वैद्यने आपल्याला ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिथे बलात्कार केला, असा गंभीर आरोप पीडित महिलेनं केला आहे. एवढंच नाही तर यानंतर सतीश वैद्यने धमकावल्याचाही आरोप महिलेनं केला. जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर पतीला सर्व प्रकार सांगू, अशी धमकी देत ब्लॅकमेल केल्याचंही महिलेने पोलिसांनी सांगितलं. वाचा अन्य बातम्या नांदेडच्या राजकारणात खळबळ, MIM च्या उमेदवारानेच घेतली काँग्रेस नेत्याची भेट नेत्यांनी पक्ष सोडल्यावर त्रास होतो का? शरद पवार म्हणतात… उदयनराजेंच्या अडचणी वाढणार? राष्ट्रवादीचे ‘हे’ 4 दिग्गज आव्हान देण्याच्या तयारीत अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.