जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी : हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी डॉ. विजयलक्ष्मी रमानन यांचं निधन

मोठी बातमी : हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी डॉ. विजयलक्ष्मी रमानन यांचं निधन

मोठी बातमी : हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी डॉ. विजयलक्ष्मी रमानन यांचं निधन

हवाई दलात सुरुवातीच्या दिवसात महिला अधिकारी असणं ही अभिमानाची बाब आहे. इतक्या पुरुषांमध्ये त्या एकमेव महिला अधिकारी म्हणून काम करीत होत्या

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर डॉ. विजयलक्ष्मी रमानन (Vijayalakshmi Ramanan) (सेवानिवृत्त) वीएसएम यांचं रविवारी रात्री निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. (vijayalakshmi ramanan passes away) त्या 96 वर्षांच्या होत्या. विजयलक्ष्मी हवाई दलाच्या (Airforce) पहिल्या महिला अधिकारी होत्या. आपल्या मुलीच्या घरी रात्री 8.50 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या 2  ऑगस्ट 1955 साली वायुसेनेमध्ये अधिकारी म्हणून काम करीत होत्या. 22 ऑगस्ट 1972 रोजी ते त्या विंग कमांडर झाल्या. त्या 28 फेब्रुवारी 1979 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या काळात महिलांनी हवाई दलासारख्या पुरुषांची संख्या असलेल्या ठिकाणी काम करणे सोपे नव्हते. यासाठी खूप जास्त तयारी आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते. 1955 या सालात त्या हवाई दलात अधिकारी म्हणून काम करीत होत्या. सध्या नवरात्रोत्सवानिमित्ताने आपण देशभरात नवदुर्गाची पूजा करीत आहोत. त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पाहायला मिळत आहे. यामध्ये त्यांनी आपला हवाई दलाचा अनुभव शेअर केला आहे.

जाहिरात

हे ही वाचा- आता Twitter वर जम्मू-काश्मीर दाखवलं चीनमध्ये; सोशल मीडियावर खळबळ महिलांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करीत आहोत. या दिवसात विजयलक्ष्मी यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एका मुलाखतीत त्यांनी महिलांसाठी एक संदेश दिला आहे. त्या म्हणतात…सुरुवातीच्या दिवसात मला हवाईन दलात काम करायची भीती वाटत होती. कारण यापूर्वी मी पुरुषांसोबत काम केलं नव्हतं. मात्र त्यात, शिस्त आणि कामप्रती असलेल्या प्रेमामुळे मी यश संपादन केलं. हवाई दलात देशासाठी काम करीत असतात घर, संसार हा दुय्यम असतो आधी तुमचं काम महत्त्वाचं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात