पुण्याहून ट्रकमध्ये लपून 33 मजूर निघाले घरी, 5 दिवसांपासून सुरु होता जीवघेणा प्रवास

पुण्याहून ट्रकमध्ये लपून 33 मजूर निघाले घरी, 5 दिवसांपासून सुरु होता जीवघेणा प्रवास

देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अद्यापही मजुरांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.

  • Share this:

देहरादून, 17 मे : देशभरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी वाढविण्यात आला आहे. अद्यापही अनेक मजुरांना आपल्या गावी जाता आलेलं नाही, त्यामुळे त्याचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. कोरोनाच्या संकटात मध्य प्रदेशातील प्रवासी आपल्या गावी येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यापैकी अनेकजण कित्येक दिवसांपासून पायी प्रवास करीत आहेत. अनेकजण तर अद्यापही ट्रकमध्ये लपून-छपून प्रवास करीत आहेत. असंच एक प्रकरण रविवारी समोर आलं आहे.

पोलिसांनी हरिद्वार जनपदकडून येणारा ट्रक चेकपोस्टवर पकडला व त्याचा तपास करीत असताना त्यात 33 प्रवासी मजुर बसले होते. यांच्याकडे राज्यात येण्याची परवानगी नव्हती. दुसरीकडे जेव्हा पोलिसांनी ड्रायव्हरकडे चौकशी करायचा प्रयत्न केला तेव्हा तो फरार झाला. सध्या त्या ड्रायवरचा तपास सुरू आहे.

जेव्हा पोलिसांनी त्या प्रवासी मजुरांची चौकशी केली तेव्हा ते सर्व प्रवासी पुण्याहून (Pune) आल्याचे समोर आले. हे सर्वजण पुण्यातील विविध भागांमध्ये काम करतात. ते मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणताही मार्ग नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर या ट्रकमालकाच्या मदतीने त्यांनी लपून प्रवास करण्याची जोखीम उचलली.

13 मे रोजी पुण्याहून निघाले होते, मात्र त्यांच्याकडे परवानगी नव्हती. सध्या या 33 जणांना वैद्यकीय परीक्षण केलं जात आहे. अशा स्वरुपात आल्याने त्यांनी लॉकडाऊनचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

हे वाचा  - भारतातील 'आत्मनिर्भर' गावं, कोरोनाच्या संकटानंतर देशासाठी ठरू शकतात मॉडेल

Lockdown मध्ये आजारी बापासह सायकलवरुन लेकीने केला 7 दिवसात 1000 किमी प्रवास

First published: May 17, 2020, 11:26 PM IST

ताज्या बातम्या