मराठी बातम्या /बातम्या /देश /देश हादरला! आंदोलनस्थळी बळीराजाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

देश हादरला! आंदोलनस्थळी बळीराजाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला 1 वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यान आज एका शेतकऱ्याने आंदोलनस्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला 1 वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यान आज एका शेतकऱ्याने आंदोलनस्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला 1 वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यान आज एका शेतकऱ्याने आंदोलनस्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पंजाबमधील (Punjab News) सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका 45 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer Suicide) बुधवारी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळला. मिळालेल्या माहितीनुसार गुरप्रीत सिंग असे मृत शेतकऱ्याचे नाव असून तो पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील अमरोह जिल्ह्यातील येथील रहिवासी होता.

2020 च्या तीन शेती कायद्यांविरोधात उत्तर भारतातील अनेक शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करीत आहेत. शेती सुधारणा कायदा 2020 मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. कांना किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी नवीन कायदा करावा सासारख्या मागण्याघेऊन शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागच्या वर्षीपासून तळ ठोकून आहेत. (The country shocked farmer committed suicide by hanging himself from a tree at the delhi protest site)

हे ही वाचा-Twitterवर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले मोदी; पहिल्या स्थानी कोण?

26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला 1 वर्षे पूर्ण होत आहे. दरम्यान आज एका शेतकऱ्याने आंदोलनस्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हादरवून टाकणारी आहे. देशातील विविध भागांमधून शेतकरी आत्महत्यांचे वृत्त मन खिन्न करणारे आहे. बऱ्याचदा निसर्गाची साथ न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागते. अशात कर्जाचा बोजा सहन न झाल्याने कित्येत शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतात.

गेल्या वर्षभरापासून शेतकरी आपल्या हक्कासाठी येथे तळ ठोकून आहेत. 29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना दररोज 500 ट्रॅक्टर शेतकरी संसदेकडे कूच करणार आहेत. सिंगू सीमेवर मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.

First published:

Tags: Farmer protest, Farmers protest, Suicide case