दौसा, 28 जुलै : राजस्थानात जारी राजकीय वादादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या एका खासदार महिलेने विचित्र वक्तव्य केलं आहे. जे एकून तुम्हीही हैराण व्हाल… भाजप खासदार जसकौर मीणा या म्हणाल्या – अयोध्येत राम मंदिर तयार झाल्यानंतर देशातील कोरोना व्हायरस आपोआप नष्ट होईल. आता जसकौर मीणा यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरू आहे. जसकौर मीणा यांच्याआधी अनेक नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी सांगितले की राम मंदिर निर्माण सुरू होताच कोरोना व्हायरसचा नष्ट होण्यास सुरुवात होईल. हळूहळू कोरोना संपुष्टात येईल. 5 दिवसांपूर्वी रामेश्वर शर्मा यांनी दावा केला होता की लवकरच कोरोनाचा विनाश होण्यास सुरू होईल. हे वाचा- इस्रायलच्या PM च्या मुलाचा प्रताप, सोशल मीडियावर केला हिंदू देवतांचा अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर निर्माण भूमीपूजन करणार आहेत. 9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे. 25 मार्च रोजी गर्भगृहावर असलेल्या मूर्तींना तात्पुरत्या मंदिरात स्थापित करण्यात आलं होतं. त्यानंतर मुळ गर्भगृहाची जागा समतल करण्यात आली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम निट नेटका व्हावा यासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलं आहे. राम मंदिराच्या चळवळीत ज्या नेत्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना या भूमिपूजन कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.