Home /News /national /

कोरोना योद्ध्यांची परिस्थिती बिकट, 24 तासांपूर्वी पॉझिटिव्ह आलेली नर्स अद्याप उपचाराविना

कोरोना योद्ध्यांची परिस्थिती बिकट, 24 तासांपूर्वी पॉझिटिव्ह आलेली नर्स अद्याप उपचाराविना

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 33 लाखांच्या वर गेली आहे.

जर आरोग्य कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे तर गरीबांना काय सोसावं लागत असेल याचा विचार करू शकतो, सीमाच्या पत्नीने व्यवस्थेविषयी राग व्यक्त केला

    नवी दिल्ली, 23 एप्रिल : तब्बल 24 तासांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) झालेल्या एक नर्सला अद्याप कोणत्याही रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सीमा (नाव बदललं आहे) आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मात्र तरीही ड्यूटीवर असताना कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला कोणतीही मदत मिळाली नाही. सीमा ही गुरू तेज बहाद्दूर रुग्णालयात गेल्या सहा वर्षांपासून काम करीत आहेत. या महिन्याच्या सुरुवातील एक रुग्ण आयसीयूत भरती झाला होता. त्यावेळी सीमा ड्यूटीवर होती. एक 50 वर्षीय महिला आयसीयूत व्हेंटिलेटरवर होती. सीमा तिची काळजी घेत होती. त्या महिलेला ताप येत होता. तब्बल 9 ते 10 दिवसांनी तिची रक्ततपासणी करण्यात आली. त्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सीमाच्या पतीने दिली. सीमाचे पतीही त्याच रुग्णालयात काम करतात. त्यानंतर सीमाची तपासणी करण्यात आली. तिची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर तिला तापाची लक्षणे सुरू झाली. बुधवारी रात्री 11 वाजता तिच्या चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हे दाम्पत्य रुग्णाबाहेर सीमाला दाखल करुन घेण्यासाठी उभे होते. सीमाच्या पतीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 'जर आरोग्य कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे तर गरीबांना काय सोसावं लागत असेल याचा विचार करू शकतो. माझी बायको ड्यूटीवर असताना कोरोना प़ॉझिटिव्ह आली आहे. तिच्यासाठी रुग्णालयात दारं का बंद आहेत? 'असा सवाल सीमाच्या पतीने उभा केला आहे. News18 शी बोलताना सीमाच्या पतीने आपली भावना व्यक्त केली. याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला विचारला करण्यात आली असून अद्याप त्यांच्याकडून खुलासा आलेला नाही. संबंधित - लॉकडाऊनमुळे बायको अडकली माहेरी, नवऱ्याने रागात प्रेयसीशी लग्न करुन थाटला संसार
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या