नवी दिल्ली, 18 एप्रिल : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात देशात ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 एप्रिलपर्यंत तरी हा पुरवठा बंद असेल यानंतरचा निर्णय त्यावेळी घेण्यात येण्यात येईल. (The central government decided to cut off the supply of oxygen to the industrial sector in Covid Pendemic)
याबाबत गृह सचिव यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यांनी आपल्याकडील औद्योगिक क्षेत्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहे. पुढील आदेशापर्यंत औद्योगिक क्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशात ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील गरज भागवणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा-महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची दिल्ली सरकारला धास्ती; 4 एअरलाइन्सविरोधात FIR
कोरोनामुंळ गंभीर होणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन कमी पडतोय. त्यामुळं ऑक्जिनचा औद्योगिक वापर बंद केला आहे. पण या निर्णयामुळं औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांनाही अडचण निर्माण झालीय. कारण रेमडेसिविरचे घटक तयार करण्यासाठीदेखील ऑक्सिजन गरजेचा आहे. त्यामुळं आता यावर तोडगा निघणं गरजेचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india