नवी दिल्ली, 18 एप्रिल : राजधानी दिल्लीत कोरोनाचे नवे रेकॉर्ड समोर येत आहेत. येथे शनिवारी 24 तासात कोरोनाचे 24 हजार 357 नवीन रुग्ण समोर आले आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यातच 24 तासात 167 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यातच दिल्ली सरकारने चार प्रमुख एअरलाइन्सविरोधात कारवाई केली आहे.
दिल्ली सरकारने इंडिगो, विस्तारा, स्पाइस जेट, एअर एशियाविरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचा RTPCT रिपोर्ट चेक न केल्यामुळे कारवाईची कुऱ्हाड उगारली आहे. सरकारने DDMA अॅक्ट अंतर्गत ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा-500 कोटींची फसवणूक; कल्पतरु ग्रुपच्या फरार मालकाचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासात 24 हजार रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या आधी 24 तासात 19500 रुग्ण सापडले होते. चिंतेची बाब म्हणजे दिल्लीत पॉजिटिव्हिटीचा रेट वाढला असून 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर 24 तासांपूर्वी हा 24 टक्के होता. दिल्लीत आयसीयू बेड्ची कमतरता भासत आहे. अख्ख्या दिल्लीत मिळून 100 हून कमी आयसीयू बेड्स शिल्लक आहे.
दरम्यान देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या वेगाने होत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केवळ बाधितांच्या संख्येत वाढ होत नाहीये तर मृतकांचाही आकडा वाढत आहे. याच दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यासह मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्रही लिहिलं आहे. या पत्रात मनमोहन सिंग यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी काही उपायही सूचवले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Covid-19 positive, Delhi, Maharashtra