यूपीतील शाहजहांपूर येथून पंतप्रधान मोदी उत्तर देशातील सर्वात मोठ्या गंगा एक्सप्रेस वे ची पायाभरणी करून देशाला मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची शाहजहांपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
शाहजहांपूरच्या रेल्वे मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स्टेज सज्ज असून कार्यक्रमस्थळी सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे. मेरठपासून सुरू होणारा हा गंगा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून प्रयागराजपर्यंत पोहोचेल.
Ganga Express way हा उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणारा राज्यातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल जो मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज येथे जाईल.
गंगा द्रुतगती मार्गावर शाहजहांपूर येथे 3.5 किमी लांबीची धावपट्टी तयार केली जाणार आहे त्यामुळं हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास मदत होईल. एक्स्प्रेस वे च्या बाजूला इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवण्याचाही प्रस्ताव आहे. या एक्स्प्रेस वे मुळं औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन या क्षेत्रांना चालना मिळणार आहे.
रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यात आणि नंतर परत जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती यूपी पोलिस दलातील ADT अविनाश चंद्र यांनी दिली आहे.