जाहिरात
मराठी बातम्या / देश / क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर प्रशासनाला आली जाग

क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर प्रशासनाला आली जाग

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

याशिवाय चढ्या दराने फेस शिल्ड आणि मास्कची खरेदी मुंबईत करण्यात आली असून विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाचं हे कंत्राटं दिल्याचाही भाजपने दावा केला आहे. यावेळी ई टेंडरला बगल दिली गेल्याचे भाजपने आपल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे.

2 ते 3 दिवसांपूर्वी या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

देहरादून, 12 जून : उत्तराखंडमधील संगरोध क्वारंटाईन सेंटर मधून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहेत. देहरादूनच्या बालावाला येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये 19 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. क्वारंटाईन केंद्रात या तरूणाचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर त्याहूनही चिंताजनक म्हणजे दोन-तीन दिवस कुणालाही याबाबत माहित नव्हते. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि त्या युवकाचा मृतदेह खोलीतून ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणा आणि कोरोनाविरोधात सुरू असलेल्या सरकारच्या युद्धाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  आत्महत्या प्रकरण देहरादून येथील सरदार भगवान दास मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहात एक संस्थागत क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथून रायपूर पोलीस ठाण्यात अशी माहिती देण्यात आली की, खोलीत ठेवलेला एक माणूस दरवाजा उघडत नाही किंवा उत्तर देत नाही. खोलीत दुर्गंधी येऊ लागल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जगमोहनसिंग राणा घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. ते दरवाजा तोडून आत शिरले.  आत त्या युवकाचा मृतदेह पंखावर लटकला होता व दुर्गंधी येऊ होकी. राणा म्हणाले की हे आत्मत्याची केस असू शकते. जबलपूरहून परत आले दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शवविच्छेदनानंतरच नेमकी परिस्थिती सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतदेहासह सापडलेल्या ओळखपत्रानुसार या युवकाचे नाव संकेत मेहरा असे आहे. हरिद्वार येथील 19 वर्षीय तरूण 5 जूनच्या रात्री जबलपूरहून ट्रेनने निघाला होता. त्यानंतर त्याला देहरादून येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे त्याच्यासह आणखी 200 हून अधिक जण क्वारंटाईन होते. हे वाचा- कॅन्सरग्रस्त रम्याला वाचविण्यासाठी मराठी IPS अधिकाऱ्याची धडपड, पण…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात