जाहिरात
मराठी बातम्या / देश / सुट्टीवर घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या; 3 दिवसात चौथी घटना, परिसरात खळबळ

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या; 3 दिवसात चौथी घटना, परिसरात खळबळ

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या; 3 दिवसात चौथी घटना, परिसरात खळबळ

गेल्या तीन दिवसांपासून चौथ्यांदा दहशतवाद्यांनी अशा प्रकारे हल्ला केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 13 मार्च : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir)  शोपियां जिल्ह्यात (Shopia) शनिवारी सायंकाळी सुट्टीसाठी घरी आलेल्या सीआरपीएफच्या (CRPF) एका जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. सीआरपीएफ जवानाचा रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसरात घेराव घालण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून चौथ्यांदा दहशतवाद्यांनी अशा प्रकारे हल्ला केला आहे. सुट्टीवर आला होता मुख्तार… मुख्तार अहमद दोही सीआरपीएफमध्ये आहे. ते शनिवारी सुट्टीवर आले होते. शोपियांमध्ये राहणाऱ्या मुख्तारवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे मुख्तार गंभीर जखमी झाला. मुख्तार अहमद  यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. जम्मू-कश्मीर पोलिसांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. दहशतवाद्यांनी शोपियाचे मुख्तार अहमद दोही नामक सीआरपीएफच्या एका जवानावर गोळीबार केला. रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आहे. आणखी दोन प्रधानांवरही दहशतवादी हल्ला… सीआरपीएफच्या जवानाच्या हत्येपूर्वी काश्मीरमध्ये दोन ग्राम प्रधानांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. शुक्रवारी कुलगाममध्ये दहशथवाद्यांनी भाजपशी संबंधित संरपंच शब्बीर अहमद मीर यांची गोळी घालून हत्या केली. शब्बीरला श्रीनगरच्या बाहेरील भागात दहशतवाद्यांनी मारलं होतं. यापूर्वी बुधवारी खानमोहचे सरपंच बशीर अहमद भटची हत्या केली होती. खानमोहच्या सरपंचावर बुधवारी दहशतवाद्यांनी निशाणा साधला होता. जम्मू भागातील उधमपूर भागात एक आयईडी हल्ल्यात काही तासांनंतर ही हत्या करण्यात आली. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 14 अन्य जखमी झाले. श्रीनगरमधील व्यस्त बाजारात रविवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. यात दोघांचा मृत्यू झाला आणि 38 जणं जखमी झाले. हे ही वाचा- 50 प्रवाशांचं विमान रनवेवरच घसरलं; पायलटच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवाशी यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदच्या एका पाकिस्तानी कमांडरसह चार दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, हा संघर्ष काश्मीर घाटीतील पुलवामा, गांदरबल आणि कुपवाडा जिल्ह्यात झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात