जबलपुर, 12 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) जबलपूरमधील डुमना एअरपोर्टवर शनिवारी मोठा विमान (Plane Accident) अपघात टळला आहे. पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे 50 प्रवाशांचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 1.20 वाजता दिल्लीहून जबलपूरला के जबलपुरला पोहोचलेली एअर इंडियाची फ्लाइट AI-9617 लँडिंगदरम्यान रनवेवर घसरली. त्यामुळे विमान रनवे सोडून मैदानावर उतरलं. सुदैवाने पायलटने प्लेनवर नियंत्रण आणलं, यामुळे 50 प्रवाशांचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, हे फ्लाइट दिल्लीहून जबलपूर आणि मग बिलासपूर जाणार होतं. अपघातानंतर एअरपोर्ट प्रबंधनाने तत्काळ कारवाई केली आणि ते फ्लाइटजवळ पोहोचले. यादरम्यान विमानातील तब्बल 35 प्रवाशांना बसच्या माध्यमातून एअरपोर्ट लाऊंजपर्यंत पोहोचविण्यात आलं. अपघाताच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. काही वेळासाठी एअरपोर्ट सील… यानंतर काही वेळासाठी एअरपोर्टवरील इतर उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द केलेल्या फ्लाइट्समध्ये 6E 7307, 6E 6974, 6E 2073, SG 3006, SG 3024, 6E 6973, 6E 2071, SG 3012 यांचा समावेश आहे. एअऱपोर्टला पुढील माहिती मिळेपर्यंत सील करण्यात आलं होतं.
Madhya Pradesh | Runway excursion occurred at Jabalpur. An Alliance Air ATR-72 aircraft, with around 55 passengers onboard from Delhi, went off the runway at Jabalpur.
— ANI (@ANI) March 12, 2022
All passengers are safe. pic.twitter.com/UluvwbZhHY
देशात विमान अपघातात वाढ… देशात विमान अपघातात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या कानपूर एअऱपोर्ट कोस्टगार्डचं एक विमान लँड करीत असताना इंजिन फेल झालं. यामुळे विमानाचं संतुलन बिघडलं. विमान रनवे सोडून दुसऱ्या भागात जाऊ लागला. सुदैवाने यावेळीही मोठा अपघात टळला. रनवेवरुन बाहेर गेल्यानंतर विमान थोडं पुढे जाऊन थांबलं. यात कोणाचंही नुकसान झालेलं नाही. विमानाचा लँडिग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गेल्या मंगळवारचा असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान चेन्नईहून कानपूरला येत होतं. अचानक लँडिग करताना कोस्टगार्ड विमानाचं संतुलन बिघडल्याने रनवेवर इकडे तिकडे जाऊ लागलं. विमानाचं डाव्या बाजूचं इंजिन लँडिंगनंतर बंद झालं होतं.

)







