मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शबनमची फाशी टळणार? पुन्हा केला दयेचा अर्ज

शबनमची फाशी टळणार? पुन्हा केला दयेचा अर्ज

 उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये आपल्याच  कुटुंबातील 7 सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनमनं (Shabnam) पुन्हा एकदा दयेचा अर्ज (Mercy Petition) केला आहे. हा अर्ज आता राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे.

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये आपल्याच  कुटुंबातील 7 सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनमनं (Shabnam) पुन्हा एकदा दयेचा अर्ज (Mercy Petition) केला आहे. शबनमचे दोन वकील गुरुवारी रामपूर जिल्हा तुरुंगात पोहोचले. याठिकाणी त्यांनी तुरुंग अधिक्षकांकडे दयेचा अर्ज सोपवला. मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक आता राज्यपालांकडे हा अर्ज पाठवतील. शबनमची पहिली याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. आता राज्यपालांकडे शबनमचे वकील पुन्हा अर्ज पाठवत आहेत. तिच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलं आहे.

दुसरीकडे मथूराच्या तुरुंगात शबनमला फाशी देण्याची तयारी सुरू आहे. पवन जल्लादनंही मथुरेतील फाशीघराची दोन वेळ पहाणी केली आहे. अशात मथुरेतील तुरुंग प्रशासन आता डेथ वॉरंट जारी होण्याची प्रतिक्षा करत आहे.

याआधी शबनमचा 12 वर्षांचा मुलगा मुहम्मद ताजनंही आपल्या आईला माफी देण्याची मागणी केली आहे. शबनमच्या 12 वर्षाच्या मुलानं म्हटलं, की राष्ट्रपती अंकल, माझ्या आईला माफ करा. 14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमनं आपल्या सलीम या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्या कुटुंबातील 7 लोकांची हत्या केली होती तेव्हा ती 2 महिन्यांची गर्भवती होती. शबनमनं तुरुंगातच ताजला जन्म दिला होता. शबनमचा मित्र असलेल्या उस्मान सैफीनं ताजचा सांभाळ केला. आज ताज 12 वर्षांचा आहे. त्यानं आईला फाशी होणार असल्याचं समजताच राष्ट्रपतींकडे तिला माफ करण्याची मागणी केली.

दुसरीकडे शबनमच्या चुलतीनं म्हटलं, की तिनं हत्या केली आहे, त्यामुळे तिला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्या म्हणाल्या, की त्यावेळी आम्ही घरात असतो तर तिनं आम्हाला मारलं असतं. आम्ही घटनेनंतर अर्ध्या रात्री त्याठिकाणी पोहोचलो. पुढे त्या म्हणाल्या, की याचिका फेटाळली, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. यानंतर फाशी  दिल्यावर शबनमचा मृतदेह ताब्यात घेणार का, असा सवाल केला असता, आम्ही तिचा मृतदेह का घेऊ असा सवाल त्यांनी केला आहे. दुसरा देश असता तर तिला यापुर्वीच फाशीही झाली असती, असंही त्या म्हणाल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Shabnam, Stays on hanging