मराठी बातम्या /बातम्या /देश /जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा केलं टार्गेट किलिंग; कश्मिरी पंडिताची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा केलं टार्गेट किलिंग; कश्मिरी पंडिताची हत्या

पूरन कृष्ण भट्ट यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पूरन कृष्ण भट्ट यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पूरन कृष्ण भट्ट यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादामुळे जम्मू-काश्मीरमधली एकूण स्थिती तणावपूर्ण आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर पुन्हा दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना आपलं लक्ष्य बनवत आहेत. नुकतीच दहशतवाद्यांनी शोपियॉं येथे एका काश्मिरी पंडिताची बंदुकीच्या गोळी मारून हत्या केली आहे. या पूर्वीदेखील दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांची तसंच एका सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या केली आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचं सत्र पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येत आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

    जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबत नसल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर हल्ला केला आहे. शोपियॉंमधील चौधरी गुंड येथील रहिवासी पूरन कृष्ण भट्ट यांची शनिवारी (15 ऑक्टोबर 22) दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. पूरन कृष्ण भट्ट त्यांच्या घराच्या लॉनमध्ये होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात पूरन कृष्ण भट्ट गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    भारतीय जवानांना मिळणार सुरक्षा कवच! IITने तयार केली थ्रीडी प्रिंटेड मॉड्युलर चौकी

    ``पूरन कृष्ण भट्ट यांच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे,``अशी माहिती पोलिसांनी दिली.

    ``जम्मू-काश्मीरमधील अजून एका घटनेत आयईडी (IED) जप्त करण्यात आले आहेत. बांदिपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलाने शनिवारी (15 ऑक्टोबर 22) एक आयईडी जप्त केला. हे अत्याधुनिक स्फोटक उपकरण सुमारे 16 किलोग्रॅम वजनाचं होतं. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीरमधल्या अस्तांगो भागात हे आयईडी जप्त केलं आहे. हे स्फोटक उपकरण निकामी करण्यासाठी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आलं आहे,`` अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे यामुळे समाजात अस्वस्थतेचं आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पूर्वी दक्षिण काश्मीरमधल्या शोपियॉंमध्ये दहशतवाद्यांनी सुनील कुमार भट्ट या काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या केली होती. ते अल्पसंख्याक काश्मिरी पंडित समुदायाचे चौथे सदस्य होते. 1 मेपासून दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले आणि हत्या केलेले ते सातवे नागरिक होते. 31 मे रोजी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रजनी नावाच्या एका सरकारी महिला कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. 12 मे रोजी काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या व्यक्तीचीदेखील गोळ्या झाडून हत्या केली होती. यापैकी बहुतांश जण काश्मीरमध्ये सरकारी नोकरी करणारे होते. या घटना पाहता दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरू केल्याचं बोललं जात आहे.

    First published:

    Tags: Jammu and kashmir, Murder, Terrorist