जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'जर कॅम्पसमध्ये मंदिर आहे, तर मशिदही उभारावी' युनिव्हर्सिटीमध्ये झळकले पोस्टर्स

'जर कॅम्पसमध्ये मंदिर आहे, तर मशिदही उभारावी' युनिव्हर्सिटीमध्ये झळकले पोस्टर्स

'जर कॅम्पसमध्ये मंदिर आहे, तर मशिदही उभारावी' युनिव्हर्सिटीमध्ये झळकले पोस्टर्स

अभाविपने (ABVP) विद्यापीठ परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर आणि मशिदीवरुन हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 14 एप्रिल : उत्तर प्रदेशातील लखनऊ (Lucknow) येथील युनिव्हर्सिटीमध्ये पोस्टर लावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर अभाविपने (ABVP) विद्यापीठ परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर आणि मशिदीवरुन हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कॅम्पसमध्ये लावलेल्या पोस्टर्सवर असं लिहिलंय, की जर कॅम्पसमध्ये मंदिर आहे तर मशिदही उभारली जावी. या प्रकरणाला अभाविपने (ABVP) तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी संघटना एसएफआय लोकांकडून कम्पसमध्ये असलेलं मंदिर हटवलं जावं अशी मागणी केली जात आहे. विद्यार्थी संघटना एसएफआयने (SFI) युनिव्हर्सिटी प्रशासन कम्पसचं भगवीकरण करू इच्छित असल्याचा आरोप केला आहे. इथे RSS चं ऑफिस सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु युनिव्हर्सिटीला गोशाळा नाही तर प्रयोगशाळा हवी असल्याचंही ते म्हणाले.

हे वाचा -  शाळेची फी न भरल्याने शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, मारहाणीत विद्यार्थीनीचा हात फ्रॅक्चर

धर्म प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतंत्र मुद्दा - अभाविपने (ABVP) अशाप्रकारे लावलेल्या पोस्टर्सचा विरोध केला आहे. ABVP कार्यकर्त्यांनी असे पोस्टर्स लावलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धर्म हा प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतंत्र विषय आहे, याची निवड करण्याचा अधिकार केवळ त्या विद्यार्थ्यालाच असल्याचं आरएसएस स्टूडेंट विंग ABVP ने म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईत मशिदींवरील भोंग्याबाबत वक्तव्य केलं होतं. ‘मशिदीवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होत आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे किंवा जी काय अजान द्यायची आहे ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. भोंगे उतरवा हे नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार. हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे’ असं राज ठाकरे म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात