भयंकर! रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून कोरोनाग्रस्ताचा रिक्षातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारे PHOTO

भयंकर! रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून कोरोनाग्रस्ताचा रिक्षातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारे PHOTO

शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णाच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर

  • Share this:

हैदराबाद, 12 जुलै: देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल थांबत नाहीत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिका न मिळाल्यानं रिक्षातून घेऊन जाण्याची वेळ कुटुंबीयांवर आली आहे.

तेलंगानाच्या निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णाच्या मृतदेहाकडे दुर्लक्ष केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या निधनानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे कुटुंबीयांना रिक्षामधून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. यावेळी रुग्णालयातील एकही कर्मचारी या मृतदेहासोबत स्मशानभूमीपर्यंत आला नाही.

हे वाचा-बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव

निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिकेअभावी कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचा नातेवाईक रुग्णालयातच काम करतो त्यामुळे त्याच्या मदतीनं हा मृतदेह स्मशानभूमीत रिक्षात घालून नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार 50 वर्षांच्या व्यक्तीला 27 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची वाट पाहण्याऐवजी रिक्षा बोलवून मृतदेह स्मशानभूमीत नेला अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 12, 2020, 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading