मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दुप्पट टोल टाळायचा असेल तर पाळा Fastag चे हे 5 नियम

दुप्पट टोल टाळायचा असेल तर पाळा Fastag चे हे 5 नियम

Fastag 5 rules : जर तुम्ही तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टिकर लावले असेल आणि तुम्ही शहराबाहेर प्रवास करत असाल तर काही नियमांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे.

Fastag 5 rules : जर तुम्ही तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टिकर लावले असेल आणि तुम्ही शहराबाहेर प्रवास करत असाल तर काही नियमांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे.

Fastag 5 rules : जर तुम्ही तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टिकर लावले असेल आणि तुम्ही शहराबाहेर प्रवास करत असाल तर काही नियमांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे.

  नवी दिल्ली, 30 जुलै : महामार्गांवरून (Highway) प्रवास (Travel) करताना टोल नाक्यांवर (Toll Plaza) टोल भरण्यासाठी गर्दीमुळे लागणारा वेळ वाचण्याकरिता फास्टॅग (Fastag) ही नवी प्रणाली सरकारने लागू केली. ही प्रणाली डिजीटल (Digital) स्वरुपाची असल्याने आता प्रवाश्यांना टोल भरण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. परिणामी टोल नाक्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि वादविवाद कमी झाल्याचे दिसून येते. आता जर तुम्ही तुमच्या वाहनाला फास्टॅग स्टिकर लावले असेल आणि तुम्ही शहराबाहेर प्रवास करत असाल तर काही नियमांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. हे नियम माहिती नसतील तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा प्रसंगी दुप्पट टोल देखील भरावा लागू शकतो. फास्टॅग विषयीच्या या 5 नियमांची (Rules) माहिती जाणून घेऊ या सविस्तर...

  फास्टॅग या अनिवार्य प्रणालीचा वापर करताना काही मुलभूत नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. याबाबतची माहिती TV9 हिंदीने वृत्ताच्या माध्यमातून दिली आहे. कारसाठी फास्टॅगचा वापर आवश्यक आहे. टोल नाक्यांवर आता टोलवसुली फास्टॅगच्या माध्यमातून केली जात असल्याने तुम्हाला यासाठी रोख रक्कम देण्याची गरज नाही.

  सोडली 14 लाखाची नोकरी, आता फक्त ‘पोज’ देऊन करते करोडोंची कमाई

  फास्टॅग प्रणालीत तुम्ही टोल नाक्यावरून वाहन नेत असताना तुमच्या वाहनाच्या काचेवल लावलेल्या स्टिकरमध्ये असलेला सेन्सर (Sensor) स्कॅन केला जातो आणि टोलची रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाते. मात्र, याच अनुषंगाने काही ठराविक नियम आहेत. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे नियम माहिती नसल्यास तुमच्याकडून टोलसाठी दुप्पट रक्कम वसूल केली जाऊ शकते.

  असे आहे महत्वाचे 5 नियम

  - जर तुम्ही एखाद्या टोल प्लाझावरुन नियमित प्रवास करत असाल तर तुम्ही बॅंकेच्या माध्यमातून पास काढू शकता. यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होऊ शकते.

  - तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कार असल्यातरी एकच फास्टॅग तुम्ही सर्व गाड्यांसाठी वापरु शकत नाही. एका गाडीसाठी एक फास्टॅग या पद्धतीने तुम्हाला वापर करावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे जितक्या कार आहे, त्या प्रत्येक कारसाठी वेगवेगळा फास्टॅग स्टिकर तुम्हाला घ्यावा लागणार आहे.

  - जर तुमच्या खात्यावर (Account) पुरेसा बॅलन्स नाही किंवा तुमचा फास्टॅग खराब झालाय आणि अशातच तुम्ही टोल प्लाझावर फास्टॅग लेनमध्ये कार नेली तर टोलबुथवर तुम्हाला टोलसाठी दुप्पट रक्कम द्यावी लागेल.

  - जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल आणि टोलप्लाझावरील फास्टॅग लेनमध्ये तुम्ही तुमची कार नेली तर तुमच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जातो. त्यामुळे याबाबत ड्रायव्हिंग (Driving) करतेवेळी काळजी घेणं आवश्यक आहे.

  - जर तुम्ही तुमच्या गाडीसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) घेतला असेल तरी तुम्हाला फास्टॅग घेणं अनिवार्य आहे. यापूर्वी असा नियम नव्हता. परंतु, आता नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गाडीसाठी इन्शुरन्स घेण्यापूर्वी फास्टॅगबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.

  First published:

  Tags: Fastag