रायसेन, 13 जुलै: कोरोनामुळे शाळा-महाविद्यालं अद्यापही बंद आहेत. जुलै अखेरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता जवळपास कमीच आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुस्तकांअभावी हाल आणि गैरसोय होऊ नये म्हणून एका शिक्षकाची धडपड समोर आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली तर अभ्यास करणं अधिक सोपं होईल यासाठी शिक्षकानं जोखीम स्वीकारली आहे.
रायसेन जिल्ह्यात बऱ्याच गावांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. माती आणि मळलेल्या पायवाटा असलेल्या या दुर्गम भागात पावसाळ्यात तुफान चिखल होतो. त्यामुळे वाहतूक करणंही मुश्कील होतं. अशावेळी दळवळणाअभावी आणि कोरोनामुळे मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून पोटतीडकीनं एका शिक्षकानं बैलगाडीतून पुस्तकं आणून शाळेत ठेवली आहेत.
देशांप्रमाणेच शाळा अजूनही येथे बंद आहेत. परंतु शिक्षक केंद्र इटखेडीची पुस्तके घेऊन शिक्षक नीरज सक्सेना 5 किमी दूर असलेल्या सालेगड येथील प्राथमिक शाळेत पोहोचले.
हे वाचा-'या' 6 महिन्यात 10 हजारनं वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे नवे दर
पावसाळ्याचे दिवस त्यात पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे जागोजागी चिखल पण अशा परिस्थितीतही नीरज सक्सेना यांनी आपली जिद्द सोडली नाही तर जबाबदारी पार पाडली. त्यांनी बैलगाडीत पुस्तके ठेवली आणि स्वत: ही गाडी चालवून शाळेत पोहोचले. या शिक्षकाचं गावातच नाही तर देशभरात तुफान कौतुक होत आहे. केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जबरदस्तीनं नाही तर आपली जबाबदारी समजून ही काम त्यांनी आपल्या हाती घेतलं.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.