'या' 6 महिन्यात 10 हजारनं वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे नवे दर

'या' 6 महिन्यात 10 हजारनं वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे नवे दर

सोन्यानं गाठली पन्नाशी, जाणून घ्या सराफ बाजारातील आजचे दर

  • Share this:

मुंबई, 13 जुलै: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आणि गेल्या काही वर्षात झालेल्या सोन्याच्या दरातील आताची ही वाढ उच्चांकी आहे. सोन्याच्या दरात गुंतवणूक करणं आता महत्त्वाचं मानलं जात आहे. 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4 हजार 782 तर 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4902 हजार आहे. मुंबईत आज 22 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 49 हजार 020 तर 24 कॅरेट एका तोळ्याची किंमत 48 हजार 520 आहे.

या वर्षाच्या सुरुवातीस एक तोळा सोन्याचे दर 39 हजार रुपये होते जे आतापर्यंत 49,500 च्या विक्रमी पातळीवर गेले आहेत. वायदा बाजारात सध्या सोन्याचे दर 49 हजारांच्या पातळीवर आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सराफ बाजारातील सोन्याचे वाढलेले दर

जुलै 2020 - प्रति तोळा 49,000 हजार

जून 2020 - प्रति तोळा 48,410 हजार

मे 2020 - प्रति तोळा 47,600 हजार

एप्रिल 2020 - प्रति तोळा 41,670 हजार

मार्च 2020 - प्रति तोळा 40,200 हजार

फेब्रुवारी 2020 - प्रति तोळा 40,240 हजार

जानेवारी 2020 - प्रति तोळा 39,200 हजार

याबाबत अधिक माहिती असणाऱ्या एका तज्ज्ञाच्या मते आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने (IMF) जागतिक वाढ खुंटण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे ते असे म्हणाले आहेत की, सध्याच्या कोरोनाच्या (Coronavirus) परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेची अवस्था खूप खराब आणि चिंताजनक होण्याची शक्यता आहे. IMFच्या मते 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 4.9 टक्क्यांची घसरण होईल. अशाप्रकारे अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 13, 2020, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading