Home /News /national /

आता WhatsApp वरुनही बूक करता येणार टॅक्सी, Uber ची खास सुविधा

आता WhatsApp वरुनही बूक करता येणार टॅक्सी, Uber ची खास सुविधा

यूजर्सना यापुढे Uber अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअॅपवरुन लोक रजिस्ट्रेशन करू शकतील, राइड बुक करू शकतील आणि व्हॉट्सअॅपवरूनच ट्रिपच्या रिसिप्ट मिळवू शकतील.

    मुंबई, 2 डिसेंबर : रस्त्यावर उभं राहून टॅक्सीची वाट पाहावी लागू नये म्हणून लोक ऑनलाईन टॅक्सी बूक करण्याला प्राधान्य देतात. मात्र कधी कधी ऑनलाईन टॅक्सी बूक (Online taxi booking) करतानाही अनेक अडचणी येतात. मात्र आता किचकट प्रोसस न करता आपल्या नेहमीच्या वापराच्या व्हॉट्सअॅपमधून (WhatsApp) टॅक्सी बुक करता येणार आहे. उबर ही सुविधा घेऊन येत आहे. उबर टॅक्सी आता व्हॉट्सअॅपवरूनही बुक (Taxi Booking through WhatApp) करता येणार आहे. अमेरिकन राइड हेलिंग जायंट Uber भारतात एक नवीन सेवा सुरू करत आहे जी वापरकर्त्यांना अधिकृत Uber WhatsApp चॅटबॉटद्वारे Uber टॅक्सी बुक करण्याचा पर्याय देते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपसोबत केलेल्या भागीदारीमुळे आता लोक व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर SMS पाठवून राइड बुक करू शकतील. ही सेवा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहरातून सुरू करण्यात येत आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ही सेवा लवकरच राजधानी दिल्लीसह देशातील इतर ठिकाणी लॉन्च केली जाईल. उबरने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी सर्व भारतीयांसाठी प्रवास सुलभ करू इच्छित आहे, म्हणून आम्ही यूजर्सना व्हॉट्सअॅपद्वारे टॅक्सी बुक करण्याची सुविधा देत आहोत. यासह, यूजर्सना यापुढे Uber अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअॅपवरुन लोक रजिस्ट्रेशन करू शकतील, राइड बुक करू शकतील आणि व्हॉट्सअॅपवरूनच ट्रिपच्या रिसिप्ट मिळवू शकतील. LIC पॉलिसीधारकांनी PAN अपडेट करा, LIC च्या IPO मध्ये होईल मोठा फायदा सध्या व्हॉट्सअॅपद्वारे राईड बुक करण्याचा हा पर्याय फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल, परंतु लवकरच इतर भारतीय भाषांमध्येही त्याचा विस्तार केला जाईल. याव्यतिरिक्त, ही सेवा नवीन आणि विद्यमान युजर्ससाठी उपलब्ध आहे ज्यांनी Uber वर फक्त एका फोन नंबरसह नोंदणी केली आहे. मात्र, उबरने अद्याप कोणताही व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केलेला नाही. Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर अशी बूक करा Uber टॅक्सी >> व्हॉट्सअॅप यूजर्स तीन प्रकारे उबर राइड्स बुक करू शकतील. >> प्रथम, व्हॉट्सअॅप यूजर्स Uber च्या बिझनेस अकाऊंट नंबरवर मेसेज पाठवू शकतात. >> दोन, ते QR कोड स्कॅन करू शकतात. >> तीन, ते Uber WhatsApp चॅट उघडण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करू शकतात. >> जे यूजर्स व्हॉट्सअॅपवर Uber शी चॅट सुरू करतील त्यांना पिकअप आणि ड्रॉप डेस्टिनेशन (Pickup and Drop Destination) माहिती देण्यास सांगितले जाईल. त्यानंतर यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच भाड्यासह ड्रायव्हरच्या येण्याची अपेक्षित वेळ कळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Taxi, Whatsapp

    पुढील बातम्या