बिलासपूर, 13 ऑगस्ट: कोरोनापासून वाचण्यासाठी भन्नाट जुगाड केल्याचं पाहिलं. आता महापुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी जुगाड केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. महापुरात बुडत असलेल्या तिघांना वाचवण्यासाठी चक्क जेसीबीची मदत घेतली आहे. हा व्हिडीओ छत्तीसगडमधील बिलासपूर येथील IPS अधिकार दिपांशू काबरा यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता महापुरात कार अडकली या कारमधले तीन जण बाहेर पडून टपावर बसले आहेत. एकीकडे पाण्यानं त्यांना वेढलं आहे. तर दुसरीकडे जीव वाचवण्यासाठी या तिघांची धडपड सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
जुगाड़ rescue 😂😝😝 pic.twitter.com/dnUulNnoxB
— Dipanshu Kabra (@ipskabra) August 12, 2020
He move smartly, as per water flow. Not going directly to car. 👍
— Anup Sayare (@sayareakd) August 12, 2020
हे वाचा- आता IPL 2020 मध्ये खेळणार ‘आदित्य ठाकरे’, विराटनं आपल्या संघात केलं सामिल ही धडपड पाहून एक पोलीस अधिकारी या तिघांना वाचवण्यासाठी एक जुगाड करतो. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जेसीबीच्या सहाय्यानं तिघांना रेस्क्यू केलं आहे. जेसीबी चालकानं पुरातून वाढ काढत तीन जण अडकले होते त्या ठिकाणापर्यंत पोहोचला. जेसीबीचा पुढचा भाग पॉकलँडमध्ये तिघांनाही अलगद उचलून पुरातून रेस्क्यू करत जीव वाचवला आहे. जेसीबी चालकाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे. या जुगाडू आयडियामुळे पुरात अडकलेल्या तीन जणांना जीवदान मिळालं.