आमचा 'रावण' नेहमी अपराजित राहिला, पण शेवटी...! 'शिंग असलेल्या सिंहा'च्या मृत्यूने दुःखात बुडाला अवघा गाव

आमचा 'रावण' नेहमी अपराजित राहिला, पण शेवटी...!  'शिंग असलेल्या सिंहा'च्या मृत्यूने दुःखात बुडाला अवघा गाव

Jallikattu Bull Ravanan Dies : मुके प्राणी न बोलता माणसाला जीव लावतात. ग्रामीण भागात आजही गाय-बैलाला घरचा सदस्यच मानलं जातं.

  • Share this:

पुडुकोट्टाई, 27 फेब्रुवारी : पुडुकोट्टाई मधलं नेमिलीपट्टी हे खेडं शुक्रवारी मोठ्याच दुःखात बुडालं. एक जिवलग सगळ्या गावानं गमावला होता. त्याचा विरह कुणालाच सहन होण्यासारखा नव्हता. (Nemmeliapatti village of Tamilnadu state mourned over a bull death)

या जीवलगाचं नाव होतं रावणन. जालिकट्टू (Jallikattu) हा तामिळनाडूमधला एक लोकप्रिय खेळ. या खेळात आपला जीव पणाला लावत सहभागी होणारा ताकदवान बैल होता रावणन. रावणनला 'कोंबू वाछा सिंगम' (शिंग असलेला सिंह') म्हणून ओळखलं जायचं. New Indian Express नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Jallikattu bull died in Tamilnadu)

आजवर रावणन या अटीतटीच्या खेळात अजिंक्य राहिला होता. आता मात्र खेळात तो पराभूत झाला आहे. याला कारणीभूत ठरला एक साप. सर्पदंशानं रावणनचा दुर्दैवी मृत्यू झाला. या देखण्या आणि ताकदवान बैलाचा असा अंत झाल्यामुळं सगळं गाव हळहळत आहे. (Ravanan jallikattu bull died by snake bite)

जल्लीकट्टूमध्ये गेल्यावर्षी झालेल्या अवनीयापुरम आणि अलंगानल्लूर या दोन्ही स्पर्धांमध्ये रावणन अजिंक्य राहिलेला होता. पोलीस उपनिरीक्षक आणि बॉडीबिल्डिंग चॅम्पियन पी. अनुराधा आणि तिचा भाऊ मरीमुथू हे दोघे आजवर रावणनला वाढवत आणि त्याची काळजी घेत असायचे. अनुराधा यांनी २०१९ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्यावर तिला मिळालेली भेट म्हणजे रावणन होता. (Jallikattu bull owned by P Anuradha dies by snake bite)

सावधान! तुम्हालाही येत असेल 'हा' मेसेज तर पैसे होऊ शकतात चोरी, सरकारनं दिला इशारा

रावणन  शेवटचा दिसला तो सोलागमपट्टी जल्लीकट्टूमध्ये. चार दिवसांपूर्वीची ही गोष्ट. त्यानंतर तो जंगलात भटकत राहिला. मरीमुथू म्हणाला, 'शुक्रवारी सकाळी आम्हाला तो मृत मिळाला. त्याचा मृत्यू सर्पदंशानं झालेला असावा असं दिसतं. तो स्पर्धेत भाग घेतलेला असताना एकदम चवताळलेला  असायचा. मात्र घरात त्याचा वावर एकदम प्रेमळ असायचा. गेल्यावर्षी अवनीपूरम, अलंगनल्लूर आणि त्रिपूर या तिन्ही इव्हेंट्समध्ये रावणन अजिंक्य राहिला.

शुक्रवारी मृत रावणला एका वाहनात ठेवलं गेलं. ग्रामस्थांनी त्याचं शेवटचं दर्शन घेतलं.  गेल्यावर्षी अवनीपूरम, अलंगनल्लूर जल्लीकट्टूमध्ये भाग घेतल्यावर रावणन खूप प्रसिद्ध झाला. त्याच्या स्वभावाबाबत बोलताना मरीमुथू म्हणाला, 'बहुतांश बैल एक ते दोन महिन्यात घरात सरावतात. मात्र रावणनला याहून जास्त काळ लागला. आम्ही त्याचा रागीट स्वभाव पाहूनच त्याचं नाव रावणन ठेवलं. त्याची त्वचा मऊ आणि डोळे भेदक होते. तो एकदम धाडसी आणि ताकदवान होता.'

हेही वाचा 'एक मार्च से दूध 100 रुपये लीटर' ट्विटरवर का ट्रेंड होतोय हा हॅशटॅग, जाणून घ्या

ग्रामपंचायतचे सरपंच सतीश कुमार म्हणाले, 'रावणन हा सगळ्या जिल्ह्याचा अभिमान होता. प्रत्येक वर्षी त्यानं स्वतःला सिद्ध केलं. आम्हा सगळ्यांना कुटुंबाचा सदस्य गमावल्यासारखं वाटतं आहे.'

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 9:35 PM IST

ताज्या बातम्या