मराठी बातम्या /बातम्या /देश /आपला नेता विजयी झाला म्हणून नवस फेडायला तिने स्वतःची जीभ कापून केली देवाला अर्पण

आपला नेता विजयी झाला म्हणून नवस फेडायला तिने स्वतःची जीभ कापून केली देवाला अर्पण

दक्षिणेत फिल्म स्टार आणि राजकारणी यांचे चाहते खूप विलक्षण आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ते आपल्या नेत्यांना देवाहून कमी मानत नाहीत आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

दक्षिणेत फिल्म स्टार आणि राजकारणी यांचे चाहते खूप विलक्षण आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ते आपल्या नेत्यांना देवाहून कमी मानत नाहीत आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

दक्षिणेत फिल्म स्टार आणि राजकारणी यांचे चाहते खूप विलक्षण आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ते आपल्या नेत्यांना देवाहून कमी मानत नाहीत आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

  चेन्नई, 3 मे: तमिळनाडूत (Tamil Nadu) फिल्म स्टार आणि राजकारणी यांचे चाहते खूप विलक्षण आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ते आपल्या नेत्यांना देवाहून कमी मानत नाहीत आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2021) 2 मे ला जाहीर झाल्यानंतर द्रमुकचे (DMK MK Stalin) एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. दशकभराने DMK ला सत्ता मिळाली म्हणून  (Tamil Nadu Election Result) पक्षाच्या एका कार्यकर्तीने बोललेला नवस पूर्ण करण्याकरता काय करावं? तिने चक्क तिची जीभ कापून (DMK supporter cuts her tongue) देवाला अर्पण केली. विश्वास बसणार नाही पण बातमी खरी आहे.

  32 वर्षांच्या वनिता (Vanitha) या द्रमुक कार्यकर्तीने ही अचाट गोष्ट केली आहे. रामनाथपुरम जिल्ह्यातल्या परमकुडी शहरात मुथलअम्मन मंदिराजवळ या मध्यमवयीन बाई मुर्छितावस्थेत दिसल्या आणि या गोष्टीचा उलगडा झाला. त्या तिथे आपला नवस फेडायला आल्याचं समजतं.

  दशकभरानंतर DMK ला सत्ता मिळाली आणि करुणानिधी यांचे चिरंजीव एम के स्टॅलिन यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर वनिता सकाळीच या मंदिरात दाखल झाल्या. पण Coronavirus Lockdown च्या निर्बंधांमुळे मंदिर उघडलेलं नव्हतं. त्यामुळे मंदिराच्या द्वारातच वनिताने आपल्या जिभेचा भाग कापला आणि तिथे ठेवला. हे करत असतानाच तिची शुद्ध हरपली. तिला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  नंदीग्राममधील पराभवानंतरही ममतादीदी CM बनणार? जाणून घ्या संविधानातील तरतुदी

  विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Assembly Election Result 2021) 234 पैकी 133 जागा मिळवून DMK ला तामिळनाडू विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.

  अशा प्रकारे टोकाचे चाहते किंवा कार्यकर्ते तामिळनाडूत नवे नाहीत. 2015 मध्ये AIMDMK च्या जयललिता यांना भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टाने दोशी ठरवलं. तेव्हा त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी जीव दिला होता. त्यानंतर पक्षाने या सर्वांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली होती. 2016 मध्ये जयललितांच्या निधनानंतर तमीळनाडूमध्ये काही लोकांनी आत्महत्या केल्याचं वृत्त होतं.

  First published:

  Tags: Tamil nadu Election