मराठी बातम्या /बातम्या /देश /

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! PF आणि पगाररचनेत होणार मोठा बदल; 1 जुलैपासून नवा कायदा लागू होणार?

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! PF आणि पगाररचनेत होणार मोठा बदल; 1 जुलैपासून नवा कायदा लागू होणार?

नवीन कामगार संहितेनुसार, कंपन्या कामाचे तास वाढवू शकतात. परंतु, त्यांना अतिरिक्त साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

नवीन कामगार संहितेनुसार, कंपन्या कामाचे तास वाढवू शकतात. परंतु, त्यांना अतिरिक्त साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

नवीन कामगार संहितेनुसार, कंपन्या कामाचे तास वाढवू शकतात. परंतु, त्यांना अतिरिक्त साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

नवी दिल्ली, 24 जून : येत्या 1 जुलैपासून बहुप्रतिक्षित नवीन कामगार कायदा (New Labour Code) लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. गेल्या एक ते दोन वर्षांपासून हा कायदा लागू होण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र सातत्यानं काही कारणांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत होती. आता सरकारनं हा कायदा लागू करण्यासाठी तयारी केली आहे. या नव्या कायद्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात पडणाऱ्या वेतनात, पीएफमध्ये आणि कामाच्या तासांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. `एनडीटिव्ही प्रॉफिट`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकार 1 जुलैपासून नवीन कामगार संहिता लागू करण्याची शक्यता आहे. नवीन संहितेमुळे (Wage Code) कर्मचाऱ्यांचे कामाचे तास (Working Hours), पीएफमधलं योगदान (PF Contribution) आणि कर्मचाऱ्यांच्या हातात पडणारं वेतन (Take Home Salary) यात मोठे बदल होतील, असं बोललं जात आहे. मजुरी, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती यांचा समावेश असलेल्या चार वेतन संहितेत 29 केंद्रीय कामगार कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. संसदेनं संहिता संमत केलेल्या आहेत. परंतु, संविधानाच्या समवर्ती सूचीत कामगार हा विषय असल्याने, राज्यांनी नवीन संहितेअंर्गत नियम अधिसूचित करणं आवश्यक आहे.

काही राज्यांनी चारही कामगार संहितांर्गत नियम तयार करणं बाकी आहे. केवळ 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेतन संहितेअंतर्गत मसुदा नियम प्रकाशित केले आहेत, असं कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं होतं.

Atal Pension Yojana : महिन्याला 210 रुपये भरा, उतारवयात मिळणार 'इतकं' पेन्शन

 नव्या कायद्यानुसार, कंपन्या कर्मचाऱ्यांचा रोजचा कामकाज कालावधी 8 ते 9 तासांवरून 12 तासांपर्यंत वाढवू शकतात; मात्र कंपन्यांना कर्मचाऱ्यांना तीन दिवस साप्ताहिक सुटी (Weekly Off) द्यावी लागणार आहे. त्यामुळे आठवड्यातलं कामकाज चार दिवसांचं केलं जाईल. परंतु, यामुळे आठवड्यातल्या कामकाजाच्या एकूण तासांवर परिणाम होणार नाही. नवीन वेतन संहितेनुसार, दर आठवड्याला एकूण 48 तास कामकाज करणं अनिवार्य असेल.

नवीन कामगार कायद्यांतर्गत सेवानिवृत्ती निधी (Retirement Corpus) आणि ग्रॅच्युइटीची (Gratuity) रक्कम वाढणार आहे. तसंच नव्या वेतन संहितेमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात पडणाऱ्या पगारात म्हणजे टेक होम सॅलरीत लक्षणीय बदल होणार आहे. नव्या वेतन संहितेनुसार मूळ वेतन एकूण मासिक पगाराच्या किमान 50 टक्के असेल. तसंच यामुळे कर्मचारी आणि कंपन्यांच्या पीएफ योगदानात वाढ होणार आहे. यामुळे खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात पडणाऱ्या पगारावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. हाती पडणाऱ्या पगाराचा आकडा कमी होऊ शकतो.

First published:

Tags: Law, Pf news