• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना, चौकशीनंतर 'हे' सत्य आलं समोर

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना, चौकशीनंतर 'हे' सत्य आलं समोर

जगप्रसिद्ध ताजमहाल (Taj Mahal) इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना अज्ञात व्यक्तीनं फोनवरुन दिल्यानं एकच खळबळ उडाली होती.

 • Share this:
  आग्रा, 04 मार्च : जगप्रसिद्ध ताजमहालच्या (Taj Mahal)  इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाल्यानं एकच खळबळ उडाली होती. जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या या इमारतीमध्ये स्फोटकं ठेवण्याची सूचना 112 नंबरवर अज्ञात व्यक्तीनं फोन करुन दिली. त्यानंतर तातडीनं ताजमहालची तिन्ही गेट बंद करण्यात आले. बॉम्ब शोधक (Bomb Squad) पथक परिसरात तातडीनं दाखल झाल्यानंतर शोध मोहीम सुरु झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा संपूर्ण परिसर पर्यटकांना बद करण्यात आला. मात्र या परिसरातील संपूर्ण तपासानंतर अखेर सत्य समोर आलं आहे. बॉम्ब ठेवल्याचा फोन हा खोडसाळपणे केल्याचं या तपासात समोर आल. त्यामुळे ताजमहालची तिन्ही गेट पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडण्यात आली आहेत. ताजमहालच्या परिसरात नेहमीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. या इमारतीला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन कोणताही धोका घेण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे एका अज्ञात व्यक्तीनं फोन केल्यानंतर तातडीनं या परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या लोकेशनचा पत्ता लागला असून ती व्यक्ती फैजाबादची असल्याची माहिती आग्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिव राम यादव यांनी दिली. त्या व्यक्तीला नंतर अटकही करण्यात आली आहे. We'd received info from control room that a man called them up saying that there are discrepancies in military recruitment & he wasn't recruited. A Bomb is kept at Taj Mahal which will explode soon. Security check is being done around Taj Mahal: Shiv Ram Yadav, SP (Protocol) Agra pic.twitter.com/crr8x8sb43 — ANI UP (@ANINewsUP) March 4, 2021 (हे वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तमिळनाडूच्या राजकारणाला नवं वळण, शशीकला यांचा राजकीय संन्यास) ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सीएसफच्या जवानांनी तातडीनं बाहेर काढले. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच लष्कराला देखील सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. आता अटक झालेल्या व्यक्तीच्या चौकशीमधून या विषयावरील अधिक सत्य समोर येणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: