लखेश्वर यादव, (छत्तीसगड) 07 मार्च : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिलांनी काही महिलांनी मोठी कमाल केल्याची बातमी समोर आला आहे. स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या 46 महिलांनी एक उपक्रम हाती घेत मोठी क्रांती केली आहे. या 46 महिलांनी शहरातील 20 वॉर्डांमध्ये घरोघरी ओला व सुका कचरा गोळा करून लाखो रुपये कमवल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना छत्तीसगड राज्यातील जांजगिर चांपा भागातील आहे.
या महिलांनी घरातून बाहेर पडणारा कचरा हे उत्पन्नाचे आणि उदरनिर्वाहाचे साधन बनवले आहे. वर्षभरात एसएलआरएम केंद्रात प्लॅस्टिक, टिन, रिकाम्या बाटल्या, बाटली आणि इतर कचरा वेगवेगळा करून विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यांनी हे प्लॅस्टीक विकून महिलांनी 1 लाख 42 हजार रुपये कमावले आहे.
MPSC क्रॅक करून सरकारी अधिकारी होणं कठीण नाहीये गड्यांनो, फक्त असा स्मार्टली करा अभ्यासया गटातील महिला दररोज सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील 20 वॉर्डांमध्ये 15 रिक्षा आणि 4 ई-रिक्षांद्वारे घरोघरी जाऊन कचरा उचलतात. दुपारी 12 पासून एसएलआरएम केंद्रावर कचरा वर्गीकरण करण्याचे काम करतात. शहरातील 20 वॉर्डांमध्ये घरोघरी कचरा उचलण्यात आल्याने या महिला शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावत आहेत. यासोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरामुक्त शहर आणि नवी दिल्ली येथील स्वच्छता पुरस्काराअंतर्गत शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे.
महिलांच्या या जिद्दीने शहर स्वच्छ होत आहे, तर गटातील महिलांची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याने त्यांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत. त्याचे शहरभर कौतुक होत आहे. शहरातील महिला काबाडकष्ट करून स्वावलंबी होत असल्याचे दिसून आले आहे.
Success Story: अहमदनगरमध्ये पिकवले हिमालयातील सफरचंद, पाहा कसा केला यशस्वी प्रयोग, Videoअकलतारा महिला गटाच्या अध्यक्षा गौरीबाई खांडे आणि खजिनदार सरोजिनी थावायत यांनी सांगितले की, गटातील 46 महिला घरोघरी कचरा संकलनासह एसएलआरएम केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण करून रिक्षातून कचरा विकत आहेत.
गटातील महिला काबाडकष्ट करून स्वावलंबी होत आहेत. दरम्यान त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आम्ही त्या महिलांना वेळोवेळी हातमोजे, गम बूट आणि साड्या देत असल्याची माहिती त्यांनी दिली.