कोझिकोड, 18 जानेवारी : जेष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरून केरळच्या लोकांनी विनाशकारी काम केल्याचं म्हटलं आहे. केरळच्या लोकांनी गांधी घराण्यातील पाचव्या पिढीतील राहुल गांधींना खासदारपदी निवडून देऊन चूक केली आहे. राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यामध्ये भारताच्या राजकारणात कठोर मेहनत आणि स्वत: निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभा करेल अशी क्षमता नाही. काँग्रेस स्वातंत्र्यकाळातील महान पक्ष ते आज एका कुटुंबाचा पक्ष झाला आहे. यामागे भारतात हिंदुत्व आणि अंध राष्ट्रवादाची वाढ हे कारण आहे. केरळ साहित्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रभक्ती विरुद्ध अंध राष्ट्रवाद या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामचंद्र गुहा बोलत होते. ते म्हणाले की, मी वैयक्तीक राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाही. ते शांत आणि सुस्वभावी व्यक्ती आहेत. पण सध्याच्या भारतातील तरुण एका कुटुंबातील पाचव्या पिढीचं नेतृत्व नको म्हणत आहे. जर तुम्ही केरळचे लोक पुन्हा 2024 मध्ये राहुल गांधींना निवड़ून देण्याची चूक कराल तर नरेंद्र मोदींनाच त्याची मदत होईल.
Historian Ramachandra Guha at Kerala Literature Festival in Kozhikode: Why did you (Malyalis) elect Rahul Gandhi to Parliament. I have nothing against Rahul Gandhi personally. He is a decent fellow,very well-mannered. But young India does not want a fifth-generation dynast.(17.1) pic.twitter.com/B8MEnPKMME
— ANI (@ANI) January 18, 2020
रामचंद्र गुहा म्हणाले की, केरळने भारतासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. पण राहुल गांधींना खासदार म्हणून निवडून देऊन एक विध्वंसक काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना रामचंद्र गुहा म्हणाले की, मोदी खऱ्या अर्थाने पुढे आहेत कारण ते राहुल गांधी नाहीत. त्यांनी हे स्थान स्वत: मिळवलं आहे. त्यांनी 15 वर्षे राज्याचे नेतृत्व केलं आणि त्यांना प्रशासनाच्या अनुभव आहे. विशेष म्हणजे ते कठोर मेहनत घेतात. कधी युरोपला जाण्यासाठी सुट्टी घेत नाहीत असं म्हणत राहुल गांधीना टोलाही लगावला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची तुलना मुघलांच्या शेवटच्या कार्यकाळाशी केली. नरेंद्र मोदी भारताचे नागरिक आहेत का? केरळमधील एकाने थेट केला सवाल

)







