जाहिरात
मराठी बातम्या / देश / Hijab Ban : हिजाब प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची मते भिन्न, काय दिला निकाल जाणून घ्या

Hijab Ban : हिजाब प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची मते भिन्न, काय दिला निकाल जाणून घ्या

Hijab Ban : हिजाब प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची मते भिन्न, काय दिला निकाल जाणून घ्या

सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (दि.13) गुरुवारी कर्नाटकच्या हिजाब वादावर आपला निर्णय दिला आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

बंगळुरू, 13 ऑक्टोंबर : मागच्या काही महिन्यांपासून कर्नाटकात हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान काही महाविद्यालयात हा वाद इतका टोकाचा झाला होता की यामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये लक्ष घालून प्रकरण मिटवले होते परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यावर आज सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज (दि.13) गुरुवारी कर्नाटकच्या हिजाब वादावर आपला निर्णय देण्यात आला. दोन्ही न्यायाधीशांची या विषयावर वेगवेगळी मते असल्याने यावर मोठे खंडपीठ बसवण्यात येणार आहे. आता या प्रकरणावर मोठ्या खंडपीठामार्फत सुनावणी होणार आहे.

जाहिरात

24 मार्च रोजी याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार होता. यावर न्यायालयातील न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठात हिजाब वादावर 10 दिवस जोरदार चर्चा सुरू होती.

उलट तपासणी दरम्यान, मुस्लिम पक्षाने हिजाबची तुलना पगडीशी केली होती. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी त्यावर टीका केली. दहा दिवसांच्या सुनावणीनंतर खंडपीठाने 22 सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात येणार आहे.

हे ही वाचा :  बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाला ई-मेल, ‘ही’ 3 चिन्हं पाठवली!

याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली

कर्नाटक उच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी राज्यातील उडुपी येथील गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजच्या मुस्लिम विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देणारी याचिका फेटाळून लावली. हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

जाहिरात

काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि त्याची सुरुवात कशी झाली?

कर्नाटकातील हिजाबचा वाद यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात सुरू झाला. जिथे मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने हे गणवेश संहितेच्या विरोधात म्हटले होते. यानंतर हा वाद कर्नाटकातील इतर शहरांमध्येही पसरला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींच्या वतीने वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

जाहिरात

हे ही वाचा : सौरभ मुखर्जींना कोणत्या शेअर्सवर भरोसा? मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी दिला गुरू मंत्र

15 मार्च रोजी दिलेल्या निकालात उच्च न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, हिजाब घालणे हा इस्लाम प्रथेचा भाग नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये गणवेशाचे पालन करण्याचा राज्याचा आदेश योग्य आहे. त्या निर्णयानंतरही वाद थांबला नाही आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात