लखनऊ,04 सप्टेंबर : आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या आयुक्त डॉ. राज शेखर (Commissioner Raj Shekhar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयुक्त राजशेखर एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सरकारी बसमधून जाताना दिसत आहेत. सिटी बसेसचे वास्तव काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांनी हे काम केले. आयुक्तांच्या थेट ग्रांऊड दौऱ्यामुळं आणि केलेल्या तपासणीनंतर परिवहन विभागात (Department of Transportation) खळबळ उडाली आहे.
बस चालक, वाहकांवर कारवाई
आयुक्त राजशेखर यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आणखी 7 अधिकाऱ्यांनीही बसमधून असा दौरा करत वास्तव परिस्थिती जाणून घेतली. सर्व बसमध्ये चालक-वाहक मास्क-युनिफॉर्मशिवाय आढळले. याशिवाय आयुक्त राजशेखर यांनी तिकिटांमधील सावळा गोंधळही पकडला. वाहकानं काही प्रवाशांकडून पैसे घेतले पण तिकीट दिले नाही. आयुक्तांनी 13 बस वाहकांना निलंबित केले आहे आणि 14 बस चालकांची सेवा तत्काळ समाप्त केली आहे. निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रवर्तन गटावरही कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
“Ground Reality Check” of City Bus services as a General Passenger.
It gives immense first hand experience & exposure of Ground situation so that Better strategy can be planned for Improvement of Public Services.@CMOfficeUP@ChiefSecyUP@NagarVikasUP pic.twitter.com/HlQhAFmQpF — Raj Shekhar IAS (@rajiasup) September 2, 2021
ARM ला सूचना
आयुक्तांनाही बसेसच्या देखभालीत निष्काळजीपणा आढळला. यासाठी एआरएमला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, त्यानंतर देखभाल करणाऱ्या खासगी एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची तयारी करण्यात आवी आहे. सध्या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bus conductor, Ias officer