जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'कोरोना महामारी अजून संपलेली नाही, आता हा व्हेरिएंट वाढवणार चिंता' - तज्ज्ञ

'कोरोना महामारी अजून संपलेली नाही, आता हा व्हेरिएंट वाढवणार चिंता' - तज्ज्ञ

'कोरोना महामारी अजून संपलेली नाही, आता हा व्हेरिएंट वाढवणार चिंता' - तज्ज्ञ

डॉ. अँथनी फाउची यांनी सावध केलं आहे की BA.2 व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 मार्च : भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे (Coronavirus Updates). कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेकदा ठिकठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येत होतं आणि याचा फटका सामान्य नागरिकांना तसंच व्यावसायिकांना बसत होता. अशात गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटली असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोनाचा बीए.2 व्हेरिएंट (BA.2 Variant of Corona) पुन्हा एकदा चिंता वाढवू शकतो, असा इशारा विशेषतज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट; आता मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल अमेरिकेतील शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी सावध केलं आहे की BA.2 व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. सीएनबीसीने रविवारी नोंदवलं की व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फाउची म्हणाले की यूएसमध्ये नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणं या उपप्रकाराशी संबंधित आहेत. ते म्हणाले की BA.2 Omicron पेक्षा 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, परंतु तो अधिक गंभीर दिसत नाही. फाउची यांनी रविवारी एबीसीच्या ‘दिस वीक’मध्ये बोलताना सांगितलं की “यात संसर्ग क्षमता वाढली आहे”. “मात्र जेव्हा तुम्ही या उपप्रकाराची प्रकरणं पाहता तेव्हा ती अधिक गंभीर स्वरूपाची दिसत नाहीत,” ते म्हणाले, या व्हायरसमुळे प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी लस आणि बूस्टर डोस हे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. या उपप्रकारामुळे चीन आणि युरोपच्या काही भागात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

जपाननंतर ऑस्ट्रेलियाची घोषणा - भारतात 1,500 कोटींची गुंतवणूक करणार

भारतीय-अमेरिकन सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी रविवारी कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी निधीच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त केली. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘जेव्हा आपण बघतो की जगभरात काय घडत आहे आणि गेल्या दोन वर्षांतील अनुभवानुसार जगातील एखाद्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणं वाढली तर इतर भागातही अनेकदा यात वाढ होताना दिसते. हे लक्षात घेऊन आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही.” “यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन” नुसार, शनिवारी देशात कोविड महामारीची 31,200 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 958 लोकांना कोरोना विषाणू संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात