मराठी बातम्या /बातम्या /देश /

चीनला ताकद दाखवण्यासाठी सज्ज; भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाने हवेत भरलं इंधन, पाहा VIDEO

चीनला ताकद दाखवण्यासाठी सज्ज; भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाने हवेत भरलं इंधन, पाहा VIDEO

आता भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI विमानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे लढाऊ विमान फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाच्या टँकर एअरक्राफ्टमधून हवेत इंधन भरत आहेत. (Fighter Jets Refuelling mid-air)

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली 19 ऑगस्ट : भारतीय वायुसेना आणि त्याचे धाडसी वैमानिक हे नेहमीच त्यांच्या धाडस आणि हेतूंसाठी ओळखले जातात. प्रत्येक कौशल्यात भारतीय हवाई दलाचे जवान अव्वल आहेत. आता भारतीय हवाई दलाच्या Su-30MKI विमानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे लढाऊ विमान फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाच्या टँकर एअरक्राफ्टमधून हवेत इंधन भरत आहेत. NSA अजित डोभाल यांच्या घरच्या सुरक्षेच चूक, CISF च्या तीन कमांडोंना डच्चू या व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. कारण जमिनीपासून अनेक हजार फूट उंचीवर उड्डाण करणे आणि हवेत इंधन भरणे हे लोकांसाठी एक अनोखं आणि रोमांचक दृश्य आहे. यापूर्वी 2020 मध्ये फ्रान्सचे राफेल विमान भारतात पोहोचले तेव्हा त्यांनीही हवेत इंधन भरलं होतं. सुखोई-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलाचं घातक लढाऊ विमान आहे. सुखोई-27 ची ही प्रगत आवृत्ती आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे लढाऊ विमान भारतात बनवतं. हे लढाऊ विमान ताशी 2120 किमी वेगाने उडतं. यात ग्रीसेव्ह-शिपुनोव्ह ऑटोकॅनन बसवलेलं आहे, जे एका मिनिटात 150 फेऱ्या मारतं. #NayeBharatKaNayaCurriculum: शालेय पुस्तकांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? शिक्षण मंत्रालयानं मागितलं लोकांचं मत सध्या तैवानवर संतापलेला चीन दक्षिण चीन समुद्राजवळ आपलं वर्चस्व दाखवतोय. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चीन तैवानला घेरून लाईव्ह फायर ड्रिल करत आहे. चीनच्या या कुरापतीला उत्तर देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सागरी भागात मोठा सराव सुरू होणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या सरावात भारतासह 17 देश सहभागी होणार आहेत. ExPitchBlack22 नावाचा हा सराव 19 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात होणार आहे. ExPitchBlack22 या सरावामध्ये जवळपास 100 लढाऊ विमानं आणि 2,500 लष्करी जवान सहभागी होणार आहेत. याच सरावासाठी भारतीय हवाई दलावे सुखोई 30 MKI आणि हवेत इंधन भरणारे विमान पाठवले आहे.
First published:

Tags: AIR STRIKE, Airplane

पुढील बातम्या