मराठी बातम्या /बातम्या /देश /

NSA अजित डोभाल यांच्या घरच्या सुरक्षेत चूक, CISF च्या तीन कमांडोंना डच्चू

NSA अजित डोभाल यांच्या घरच्या सुरक्षेत चूक, CISF च्या तीन कमांडोंना डच्चू

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Dobhal) यांच्या निवासस्थानी या वर्षाच्या सुरूवातीला सुरक्षेमध्ये चूक झाली होती. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)ने तीन कमांडोंना सेवेतून बडतर्फ केलं आहे.

    नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Dobhal) यांच्या निवासस्थानी या वर्षाच्या सुरूवातीला सुरक्षेमध्ये चूक झाली होती. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)ने तीन कमांडोंना सेवेतून बडतर्फ केलं आहे. तर सीआयएसएफच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अजित डोभाल यांना अति विशिष्ट व्यक्ती (व्हीआयपी) सुरक्षा सूचीनुसार झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांना सीआयएसएफचा खास सुरक्षा समूह (एसएसजी) सुरक्षा पुरवते. अजित डोभाल यांच्या निवासस्थानी सुरक्षेमधली ही चूक 16 फेब्रुवारीला झाली होती. यानंतर सीआयएसएफकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर वेगवेगळ्या आरोपांमध्ये 5 अधिकारी दोषी आढळले, यानंतर त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली. आता या पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एसएसजीच्या तीन कमांडोंना सेवेतून डच्चू देण्यात आला आहे, तर सुरक्षा युनिटचं नेतृत्व करणाऱ्या उप महानिरिक्षक (डीआयजी) आणि त्यांच्या पदाखाली असलेल्या कमांडंट रँकच्या वरिष्ठ अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. ज्या तीन कमांडोंना डच्चू देण्यात आला ते तिघं त्यादिवशी सुरक्षेसाठी एनएसएच्या निवासस्थानी उपस्थित होते. सुरक्षा भेदणाऱ्या व्यक्तीला एनएसए निवासस्थानाबाहेर पकडण्यात आलं आणि त्याला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या