मराठी बातम्या /बातम्या /देश /मास्क काढण्याची घाई नको! पूर्ण लसीकरणानंतरही होतेय डेल्टा व्हॅरिएंटची लागण

मास्क काढण्याची घाई नको! पूर्ण लसीकरणानंतरही होतेय डेल्टा व्हॅरिएंटची लागण

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटची (Delta Variant) पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते, असं एका संशोधनात (Delta variant research) समोर आलं आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटची (Delta Variant) पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते, असं एका संशोधनात (Delta variant research) समोर आलं आहे.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटची (Delta Variant) पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते, असं एका संशोधनात (Delta variant research) समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे जगभरात हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होत असल्यामुळे सगळीकडेच अनलॉक (India Unlock) करण्यात येत आहे; पण असं असलं तरी दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनीही खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैज्ञानिक देत आहेत. याला कारण म्हणजे, कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटची (Delta Variant) पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते, असं एका संशोधनात (Delta variant research) समोर आलं आहे. विशेष म्हणजे याबाबत बाहेरच्या देशात नाही, तर दिल्लीच्याच दोन रुग्णालयांमध्ये संशोधन करण्यात आलं.

    INSACOG कन्सॉर्शियम, सीएसआयआर (CSIR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी संयुक्तपणे हे संशोधन केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही डेल्टा व्हॅरिएंटची (Delta variant break-through) लागण झालेले कित्येक रुग्ण पाहायला मिळाले. यामध्ये जास्त जोखीम असलेल्या रुग्णांचा बळी जाऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. या संशोधनासाठी 113 ब्रेक-थ्रू रुग्णांचा (Break through patients studied) अभ्यास करण्यात आला. यासाठी संशोधकांनी संभाव्य ट्रान्समिशन नेटवर्क तयार केलं आणि व्हायरस जीनोम सिक्वेन्स डेटाचं (virus Genome sequence data) विश्लेषणही केलं.

    वाचा : महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

    पूर्वप्रकाशित अभ्यासात संशोधकांनी म्हटलं आहे, “आम्ही उच्च जोखमीच्या प्रकरणांचा अभ्यास केला, ज्यात संक्रमित व्यक्तीचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं होतं. दोन व्यक्तींमध्ये विषाणूंच्या संसर्गाचा धोका होता आणि ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते, अशा प्रकरणांचाही अभ्यास करण्यात आला.” लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्येही संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची गरज या अभ्यासात पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

    लसवंत झालात तरी निष्काळजीपणा नको

    सध्या आपण पाहत आहोत, की लसीकरण झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात बेफिकिर होत आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्या कित्येकांना आता आपल्याला कोरोनाची लागण होणारच नाही असं वाटत आहे. सरकारने अनलॉक करताना नागरिकांना योग्य ती खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र नागरिक त्याकडे काणाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे हे संशोधन अधिक महत्त्वाचं आहे.

    वाचा : कोरोनामुळे होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO चा ‘हिवाळी’ इशारा

    लस अगदीच निरुपयोगी नाही

    अर्थात, लस घेतलेल्यांनी खबरदारी बाळगायची आहे हे सांगतानाच कोरोनावरची लस मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचंही या संशोधनात सांगण्यात आलं आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असली, तरी त्यामुळे निर्माण होणारा धोका हा लशीमुळे कित्येक पटींनी कमी होत असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

    त्यामुळेच, कोरोनापासून बचावासाठी पूर्ण लसीकरणासोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क असे प्रतिबंधात्मक उपायही सुरू ठेवणं अत्यावश्यक असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Delta virus