• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोनामुळे होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO चा ‘हिवाळी’ इशारा

कोरोनामुळे होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO चा ‘हिवाळी’ इशारा

युरोपमध्ये थंडीची लाट (WHO warns surge in covid deaths in winter) येण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काही महिन्यांत साधारण 7 लाख जणांचा मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे.

 • Share this:
  कोपरहेगन, 23 नोव्हेंबर: युरोपमध्ये थंडीची लाट (WHO warns surge in covid deaths in winter) येण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काही महिन्यांत साधारण 7 लाख जणांचा मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे. युरोपात आता थंडीचे (Beginning of cold) महिने सुरु होत आहेत. इथून पुढचे काही महिने कडाक्याची थंडी असणार आहे. कोरोना रुग्णांसाठी अति थंडी मारक असून त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि (Cold is bad for corona) पर्यायाने मृत्यूंमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहे इशारा? कोपरहेगनमध्ये असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयानं कोरोनाबाबत एक मोठा संदेश दिला आहे. थंडीचा ऋतु सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीत युरोपात 7 लाख जणांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपातील 53 देशांना मिळून हा इशारा देण्यात आला आहे. बुस्टर डोसची गरज ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा नागरिकांना बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या हेडक्वार्टरनं याच्या अगदी विपरित मत नोंदवलं आहे. जगातील अनेक विकसनशील देशांमध्ये पहिला डोसही नागरिकांना घेता आलेला नाही. अशा परिस्थितीत बुस्टर डोस देणं, ही श्रीमंती देशांची चैन ठरेल. त्याऐवजी जगाच्या कल्याणाचा विचार करून श्रीमंत आणि प्रगत देशांनी त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या लसी हा गरीब आणि विकसनशील राष्ट्रांना पाठवण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलं आहे. हे वाचा- विद्यार्थिनीने फोन आपटत शिक्षिकेलाच मारली चापट; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर शिथिलता नको कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचं आहे. मात्र या बाबींकडं गेल्या काही महिन्यांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर या बाबींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलं आहे.
  Published by:desk news
  First published: