Home /News /national /

VIDEO : LockDown असतानाही नमाज पठणासाठी गर्दी, पोलीस येताच केली दगडफेक

VIDEO : LockDown असतानाही नमाज पठणासाठी गर्दी, पोलीस येताच केली दगडफेक

शुक्रवारच्या नमाजवरून उत्तर प्रदेशापासून ते कर्नाटकापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं. नमाज पठणासाठी आलेल्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली असून यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

    बेंगळुरू, 03 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. या काळात लोकांनी घरात रहावं आणि कोणत्याही ठिकाणी एकत्रित येऊ नये असं आवाहन केलं आहे.  देशातील मंदिर-मशिदीसह अनेक धार्मिक स्थळं बंद आहेत. धर्मगुरुंकडून सातत्यानं आवाहन केलं जात आहे की, संकटकाळात घरातूनच तुमचे धार्मिक विधी करा. मात्र तरीही काही लोक ऐकत नसल्याचं दिसत आहे. शुक्रवारच्या नमाजवरून उत्तर प्रदेशापासून ते कर्नाटकापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं. नमाज पठणासाठी आलेल्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली असून यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कर्नाटकातील हुबळी इथं लॉकडाउन असतानाही जुमेच्या नमाज पठणासाठी लोक मशिदीमध्ये पोहोचले. हुबळीतील मंतूर इथं असलेल्या मशिदीत गर्दी झाल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी नमाज पठण कऱणाऱ्यांनी दगडफेक सुरु केली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. हुबळी-धारवाड पोलिस आयुक्त आर दिलीप यांनी सांगितंलं की दोषींची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. याआधी उत्तर प्रदेशातही असाच प्रकार समोर आला होता. लॉकडाउन असूनही नमाज पठण करण्यासाठी कन्नौज इथल्या हाजीगंजमधील एका घरात नमाजसाठी गर्दी झाली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा गर्दी हटवण्यासाठी पथक त्याठिकाणी गेले. मात्र तेव्हा नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. जमाव इतका आक्रमक होता की पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी तिथून निघावं लागलं. हे वाचा : LockDown! प्रेमासाठी Coronaची कहाणी रचली आणि कामवाली अडचणीत आली
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या