मराठी बातम्या /बातम्या /देश /Air India पुन्हा वादात; फ्लाइटमध्ये फ्री जेवणात असं काही दिसलं की महिला प्रवाशाचा संताप!

Air India पुन्हा वादात; फ्लाइटमध्ये फ्री जेवणात असं काही दिसलं की महिला प्रवाशाचा संताप!

photo credit - @DrSarvapriya

photo credit - @DrSarvapriya

विशेष म्हणजे सोमवारी नियामक DGCA ने प्रवाशासोबत असभ्य वर्तनाच्या दोन प्रकरणांबाबत एअर इंडियाला नोटीस पाठवली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 10 जानेवारी : अलीकडच्या काळात काही घटनांमुळे वादात सापडलेल्या एअर इंडियाला आणखी एका बाबतीत अडचणीचा सामना करावा लागला आहे. एका महिलेने ट्विटरवर एक फोटो शेअर करत दावा केला आहे की, विमानात एअर इंडियाने दिलेल्या जेवणात त्यांना दगडाचा तुकडा सापडला आहे.

सर्वप्रिय सांगवान यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, एअर इडिया (@airindiain)., दगडमुक्त जेवणासाठी निश्चित करण्यासाठी तुम्हाला संसाधने आणि पैशांची आवश्यकता नाही. आज फ्लाइट AI 215 मध्ये मला माझ्या जेवणात जे मिळाले ते येथे आहे. मी क्रू मेंबर जादोनला कळवले आहे. असा निष्काळजीपणा अस्वीकार्य आहे.

यानंतर त्यांच्या ट्विटला उत्तर देताना एअर इंडियाने म्हटले की, 'प्रिय मॅडम, हे चिंताजनक आहे आणि आम्ही आमच्या केटरिंग टीमच्या समोर लगेचच हे ठेवत आहोत. कृपया आम्हाला या प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ द्या. हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो.

तर याप्रकरणई एका यूजरने म्हटले की, "प्रिय @TataCompanies: JRD Tata ने एकदा विमान उद्योगासाठी बेंचमार्क सेट केले. सरकारी नियंत्रणाखाली येण्यापूर्वी त्यांनी #AirIndia हा जागतिक स्तरावर प्रतिष्ठित ब्रँड बनवला. आता तुम्ही मालक म्हणून परत आला आहात, नवीन खालच्या पातळीवर? कॉर्पोरेट निरीक्षण नाही का? तुम्ही #PeeGate आणि आता हे कसे व्यवस्थापित करता.

विशेष म्हणजे सोमवारी नियामक DGCA ने प्रवाशासोबत असभ्य वर्तनाच्या दोन प्रकरणांबाबत एअर इंडियाला नोटीस पाठवली आहे. तुमच्याकडून वेळीच कारवाई का झाली नाही, असे डीजीसीएकडून एअर इंडियाला सांगण्यात आले आहे. त्यात आता जेवणात दगड निघाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

First published:

Tags: Air india, Domestic flight, Travel by flight