मराठी बातम्या /बातम्या /देश /

विद्यार्थ्याने बिकनीवरील फोटो पाहिल्याने प्राध्यापिकेला द्यावा लागला राजीनामा; काय आहे नेमकं प्रकरण?

विद्यार्थ्याने बिकनीवरील फोटो पाहिल्याने प्राध्यापिकेला द्यावा लागला राजीनामा; काय आहे नेमकं प्रकरण?

मुलाने इंस्टाग्रामवर बिकिनीमध्ये त्यांचे फोटो पाहिल्याची तक्रार पालकांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीवरुन आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
कोलकाता, 9 ऑगस्ट : कोलकाता येथील एका महिला प्राध्यापिकेच्या राजीनाम्याचं प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. कारण त्यांच्यावर राजीनाम्यासाठी ज्या कारणामुळे दबाव टाकण्यात आला ते कारणही तितकच महत्त्वाचं आहे. कोलकाता येथील सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटीच्या माजी सहाय्यक प्राध्यापिकेने कॉलेज प्रशासनावर राजीनाम्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मुलाने इंस्टाग्रामवर बिकिनीमध्ये त्यांचे फोटो पाहिल्याची तक्रार पालकांनी केली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीवरुन आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी सहाय्यक प्राध्यापिकेने सांगितले की, प्रथम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीचं पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी आपल्या मुलाला विद्यापीठातील प्राध्यापिकेचे बिकिनीवरील अश्लील फोटो पाहताना पकडले. या पत्राच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. मेव्हणीच्या लग्नाला नकार, प्रियकराबरोबरच मेव्हणाही चढला टॉवरवर; असा रंगला खेळ पालकांनी लिहिलेले हे तक्रारीचे पत्र सोशल मीडियावरून समोर आले आहे. पत्रानुसार, अलीकडेच मी माझ्या मुलाला प्राध्यापिकेचे काही फोटो पाहताना पकडले. शिक्षिकेने तिच्या अंडरगारमेंटमधील फोटो सोशल मीडियावर अपलोड करणे लज्जास्पद आहे. एक पालक म्हणून माझ्यासाठीही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना बिहारमध्ये भाजपला मोठा झटका! नितीश कुमारांचा धक्का
 हे प्रकरण गेल्या वर्षीचे आहे जे आता समोर आले आहे. या तक्रारीनंतर सेंट झेव्हिअरचे कुलगुरू आणि इतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, असे माजी सहाय्यक प्राध्यापिकेने सांगितले. यावेळी त्यांना तक्रारीचं पत्र दाखवण्यात आले. त्याला काही कागदपत्रेही जोडण्यात आली होती, ज्यात त्यांच्या खाजगी इंस्टाग्राम अकाउंटवरील काही फोटो होते. त्या लोकांना ते फोटो कसे मिळाले आणि हे फोटो आक्षेपार्ह आहेत का, हे मला माहीत नाही, असं आपली बाजू मांडताना प्राध्यापिकेने सांगितले आहे.
प्राध्यापिकेने 24 ऑक्टोबर 2021 रोजी दाखल केलेल्या पोलिस अहवालात दावा केला आहे की तिचे खाजगी इंस्टाग्राम खाते हॅक केले गेले असावे. ज्यामुळे तिचे फोटो त्यांना मिळाले.
First published:

Tags: Kolkata, Student

पुढील बातम्या