मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मेव्हणीच्या लग्नाला नकार, प्रियकराबरोबरच मेव्हणाही चढला टॉवरवर; असा रंगला खेळ

मेव्हणीच्या लग्नाला नकार, प्रियकराबरोबरच मेव्हणाही चढला टॉवरवर; असा रंगला खेळ

टॉवरवर हा खेळ पाहण्यासाठी अख्खं गाव गोळा झालं होतं.

टॉवरवर हा खेळ पाहण्यासाठी अख्खं गाव गोळा झालं होतं.

टॉवरवर हा खेळ पाहण्यासाठी अख्खं गाव गोळा झालं होतं.

    पाटना, 7 ऑगस्ट : प्रेम प्रकरणात आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी लोक काहीही करू शकतात. या प्रकरणात काहींचं नशीब साथ देतं तर काहींना तुरुंगवास भोगावा लागतो. पुन्हा एक बिहारमधून अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रियकराने प्रेयसीसोबत लग्न करण्याच्या हट्टापायी टॉवरच चढला. यानंतर तरुणीने प्रियकरासोबत लग्न करण्याचंही मान्य केलं. मात्र दोघांच्या लग्नात मेव्हण्याने खो घातला. आणि प्रियकर टॉवरवरुन खाली उतरताच मेव्हणा 150 फूट टॉवरच चढला. झाशी येथे राहणारी एक तरुणी आपल्या मेव्हण्याच्या घरी राहते. येथील एका तरुणासोबत तिचे प्रेम संबंध सुरू झाले. याबाबत कळताच मेव्हणा आणि त्याचे नातेवाईक तिला मारहाण करीत होते. तिच्यावर बंधन लावली होती. त्यामुळे तरुणी आपल्या प्रियकराला भेटू शकत नव्हती. यामुळे संतापलेल्या प्रियकराने शनिवारी दुपारी गावातील मोठ्या टॉवरवर चढला आणि खाली उतरण्यासाठी प्रेयसीला लग्नाची अट घातली. यावेळी गावकरीही जमा झाले. यानंतर पोलिसांनी तरुणीला बोलावलं. तरुणीनेही प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. इथं तरुणाला लग्नाचं आश्वासन देऊन खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे हे प्रकरण इथेच सोडवण्यात आलं. मात्र यानंतर हे लग्न रोखण्यासाठी तरुणीचा मेव्हणा त्याच टॉवरच चढला. जर मेव्हणीचं लग्न झालं तर टॉवरवरुन उडी मारण्याची धमकी दिली. ज्यानंतर पोलीस अधिकारी पुन्हा घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी पोलिसांनी कसंबसं करुन त्याला खाली उतरवलं. तिघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन गेले व येथे त्यांची समजूत काढली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Marriage

    पुढील बातम्या