मराठी बातम्या /बातम्या /देश /

चालती बस मध्येच थांबवून ड्रायव्हर झाला गायब, थोडक्यात बचावले प्रवासी

चालती बस मध्येच थांबवून ड्रायव्हर झाला गायब, थोडक्यात बचावले प्रवासी

राज्य परिवहन सेवेच्या (ST Driver stops bus on the road and run away) बसचालकानं प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच सोडून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्य परिवहन सेवेच्या (ST Driver stops bus on the road and run away) बसचालकानं प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच सोडून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्य परिवहन सेवेच्या (ST Driver stops bus on the road and run away) बसचालकानं प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच सोडून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 12 नोव्हेंबर: राज्य परिवहन सेवेच्या (ST Driver stops bus on the road and run away) बसचालकानं प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यातच सोडून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस अचानक त्याने रस्त्यात थांबवली आणि बसमधून उतरून (Got out on duty and leaves bus on road) तो पळून गेला. सुदैवाने या बसला इतर कुठल्या वाहनाने धडक दिली नाही, मात्र चालकाच्या या कृतीमुळे अनेक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.

ड्रायव्हरने रस्त्यातच थांबवली बस

राजस्थानमधील चुरू बस डेपोचा ड्रायव्हर ड्युटीवर येण्यापूर्वी दारू प्यायला होता. 25 प्रवाशांना घेऊन ही बस रतनगडवरून चुरूकडे येत होती. ही बस वाटेतच थांबवून ड्रायव्हर बसमधून उतरला आणि बसपासून लांब पळून गेला. नशेच्या धुंदीत ड्रायव्हरने हे कृत्य केल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला. सुरुवातीचे काही क्षण नेमकं काय घडतंय, हे प्रवाशांना कळतच नव्हतं. त्यानंतर काही वेळाने प्रवासी बसमधून खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूला ड्रायव्हरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर कुठेच दिसला नाही.

प्रवासी संतप्त

चालती बस वाटेतच थांबवून ड्रायव्हर पळून गेल्यामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी आगारात फोन लावून घटनेची कल्पना दिली. पोलिसांतही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. आगाराकडून प्रवाशांना मागून येणाऱ्या बसने प्रवास करण्याची विनंती केली. काही वेळातच पाठीमागून येणाऱ्या बसमधून प्रवास करत प्रवासी चुरुला पोहोचले.

पोलिसांनी घेतला शोध

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चालकाचा शोध घेतला. चालक संजय श्योराण हा जवळच्याच एका गावातील उसाच्या शेतात जाऊन लपला होता. दारुच्या नशेत धुंद असणाऱ्या चालक संजयला पोलिसांनी अटक करून त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवून दिलं. त्याच्या रक्ताच्या चाचणीतून अल्कोहोलचे नमुने मिळाले, तर त्याला कायमस्वरूपी नोकरीवरून काढून टाकण्याचा इशारा आगाराने दिला आहे.

हे वाचा- st bus strike : शरद पवार आणि राज ठाकरेंची बैठक संपली, महत्त्वाची माहिती समोर

यापूर्वीदेखील संजयने असाच प्रकार केला होता. चालती बस मध्येच थांबवून तो पसार झाला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी केवळ समज देऊन त्याला सोडून दिलं होतं. त्याची वैद्यकीय चाचणी त्यावेळी झाली नव्हती. आता ही चाचणी करण्यात आली असून त्याच्या रिपोर्टनंतर कडक कारवाई करण्याचा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

First published:

Tags: Rajasabha, St bus