मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कापलेली करंगळी हातात घेऊन ती पोहोचली पोलीस ठाण्यात; घटना ऐकून पोलीसही हादरले, महिलेच्या धाडसाचं कौतुक

कापलेली करंगळी हातात घेऊन ती पोहोचली पोलीस ठाण्यात; घटना ऐकून पोलीसही हादरले, महिलेच्या धाडसाचं कौतुक

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

एक महिला आपल्या हातात कापलेली करंगळी घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. समोरचं दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 6 फेब्रुवारी : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी एक महिला आपल्या हातात कापलेली करंगळी घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. समोरचं दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. मात्र या महिलेने जेव्हा या कापलेल्या करंगळीमागची घटना पोलिसांना सांगितली तेव्हा पोलीसही आश्चर्यचकीत झाले. पोलिसांनी या महिलेचं कौतुक केलं आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल केली असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.

गावाकडे परतत असताना घडली घटना

ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या कौशाम्बी जिल्ह्यातल्या करारी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्योहर गावातील. महिलेले पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे ही महिला बाजारातून भाजी खरेदी करून गावाकडे परतत होती. ही महिला एकटी असल्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने या महिलेवर चोरीच्या उद्देशानं हल्ला केला. यावेळी संबंधित महिला आणि आरोपीमध्ये झटापट झाली. आरोपीने महिलेचं तोंड दाबल्यामुळे तिला ओरडता देखील येत नव्हतं. मात्र अशाही परिस्थितीमध्ये महिलेनं हार मानली नाही. या घटनेनंतर महिलेनं आरोपीची करंगळी कापली.

हेही वाचा : पुणे : व्याजाने घेतलेले पैसे परत केले, तरीही मारहाण करुन पैशांची मागणी, कंटाळून टोकाचं पाऊल

 पोलिसांकडून महिलेचं कौतुक

करंगळी कापल्यामुळे आरोपी जखमी झाला होता. याचाच फायदा घेऊन महिलेने जोरात ओरडायला सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक घटनास्थळी येत असल्याचं पाहून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. या हल्ल्यात महिला देखील जखमी झाली आहे, तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर महिला जखमी अवस्थेत हातात कापलेली करंगळी घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी जेव्हा या महिलेची कथा ऐकली तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Crime, Crime news