जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतातल्या या 4 शहरांमध्ये आज रात्री दिसणार स्पेस स्टेशन, संधी मिळाली तर चुकवू नका

भारतातल्या या 4 शहरांमध्ये आज रात्री दिसणार स्पेस स्टेशन, संधी मिळाली तर चुकवू नका

भारतातल्या या 4 शहरांमध्ये आज रात्री दिसणार स्पेस स्टेशन, संधी मिळाली तर चुकवू नका

चमकणाऱ्या विमानासारखं ते दिसेल. मात्र या स्पेस स्टेशनचा वेग हा कितीतरी पट जास्त असतो. 6 मिनिटं हे स्पेस स्टेशन दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जुलै: अंतराळातल्या ग्रहताऱ्यांबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्याचबरोबर अंतराळातल्या स्पेस मिशनबद्दही सगळ्यांनाच कुतूहल असतं. अशीच एक गोष्ट जाणून घेण्याची संधी आज भारतातल्या काही शहरांना मिळणार आहे. अवकाशातलं स्पेस स्टेशन (Space station) आज भारतातल्या चार शहरांमधून जाणार असून ते बघता येणार आहे. ताऱ्यांप्रमाणेच हे स्पेस स्टेशनही चमकत असल्याने त्याविषयी सगळ्यांनाच कुतूहल असंत. गुजरातमधल्या राजकोट आणि अहमदाबाद, दिल्ली आणि राजस्थानमधल्या जयपूर या शहरांमधून ते पाहता येणार आहे. हे स्पेस स्टेशन भारतावर जेव्हा 90 अंशांमध्ये असेल त्यावेळी ते दिसणार आहे. मंगळवारी रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी राजकोट आणि अहमदाबाद तर दिल्ली आणि जयपूर इथं ते 8 वाजून 37 मिनिटांनी दिसणार आहे. चमकणाऱ्या विमानासारखं ते दिसेल. मात्र या स्पेस स्टेशनचा वेग हा कितीतरी पट जास्त असतो. 6 मिनिटं हे स्पेस स्टेशन दिसेल. हे स्पेस स्टेशन पृथ्विला दररोज 16 फेरे मारत असते. त्यामुळे वेग वेगळ्या देशात ते दिसत असतं. जगातल्या अतिशय मोजक्याच देशांनी अंतराळात स्पेस स्टेशन्स उभारली आहे. अतिशय खर्चाचं आणि आव्हानात्मक असं हे काम असतं. अमेरिका यात आघाडीवर असून नासाचे शास्त्रज्ञ या स्पेस स्टेशनमध्ये कायम विविध प्रयोग करत असतात. इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी! या स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळविरांना अनेक दिवस खास प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. अंतराळात ज्या प्रकारचं वातावरण असतं त्याच प्रकारचं वातावरण तयार करून त्यांना त्या वातावरणात राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत… या प्रशिक्षणानंतर शारिरीक क्षमता चाचणी होते. त्यानंतर मानसिक क्षमतेची चाचणीही घेतली जाते. यात तो पास झाला तरच त्या अंतराळविरांची निवड केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात