Home /News /national /

सोनियांनी पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं! रामदास आठवलेंचं मत, अमरिंदर सिंहांना भाजपात जाण्याचा सल्ला

सोनियांनी पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं! रामदास आठवलेंचं मत, अमरिंदर सिंहांना भाजपात जाण्याचा सल्ला

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती, तर त्यांनी डॉ. मनमोहन सिंहांऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

    भोपाळ, 26 सप्टेंबर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पंतप्रधान होण्याची इच्छा नव्हती, तर त्यांनी डॉ. मनमोहन सिंहांऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. (Sonia Gandhi should  have made Sharad Pawar prime minister says Ramdas Athavale) 2004 साली जेव्हा पहिल्यांदा युपीएचं सरकार (First UPA Government) आलं, तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नव्हती, असंही आठवले म्हणाले. विदेशी जन्माचा मुद्दा गैरलागू सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा गैरलागू असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. जर कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, तर सोनिया गांधींना भारताचे पंतप्रधान व्हायला काहीच हरकत नव्हती, असं आठवले म्हणाले. सोनिया गांधींनी पंतप्रधानपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र डॉ. मनमोहन सिंहांऐवजी शरद पवारांना त्यांनी पंतप्रधानापदी बसवायला हवं होतं. पवार पंतप्रधान असते, तर देशभरात आज जी काँग्रेसची वाताहत झाली आहे, तशी झाली नसती, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवारांची स्तुती पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे आणि दूरदृष्टी असणारे मोठे नेते असल्याचं आठवले म्हणाले. पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत वेगळी चूल मांडली नसती, तर नक्कीच देशाचे पंतप्रधान झाले असते. तसं झालं असतं तर आज गेल्या काही वर्षात काँग्रेसची ताकद वाढली असती आणि आज काँग्रेसला एवढे वाईट दिवस आले नसते, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे वाचा - अमरिंदर सिंहांना भाजपात जाण्याचं आवाहन पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या डॉ. अमरिंदर सिंग यांना भाजपात येण्याचं निमंत्रण आठवले यांनी दिलं. अमरिंदर सिंग यांनी भाजप किंवा एनडीएत प्रवेश करावा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Manmohan singh, Ramdas aathavale, Sharad Pawar (Politician), Sonia gandhi

    पुढील बातम्या