जाहिरात
मराठी बातम्या / देश / मृत पित्याला 'जिवंत' केलं; मुलाने लढवली शक्कल, सर्वत्र कौतुक

मृत पित्याला 'जिवंत' केलं; मुलाने लढवली शक्कल, सर्वत्र कौतुक

लोकांना काही वर्षांनी गोड फळं खायला मिळतील, सावली मिळेल, शुद्ध हवा मिळेल.

लोकांना काही वर्षांनी गोड फळं खायला मिळतील, सावली मिळेल, शुद्ध हवा मिळेल.

‘या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला एक फळझाड देऊन पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याचा मी प्रयत्न केला आहे.’

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

रितेश कुमार, प्रतिनिधी समस्तीपूर, 25 जून : आपल्या वडिलांच्या श्राद्धाला आलेल्या लोकांना एक रोप भेट देऊन वडिलांच्या आठवणी ताज्या ठेवण्याचा प्रयत्न बिहारच्या समस्तीपूर भागातील एका तरुणाने केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी त्याने केलेल्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यातील खानापूरच्या डगरुआ गावात राहणाऱ्या रामबाबू यांचे वडील चंद्रशेखर साह यांचं निधन झालं. त्यांच्या श्राद्धाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला रामबाबूंनी वडिलांच्या स्मरणार्थ पेरूचं झाड दिलं आणि त्यांच्याकडून पर्यावरण रक्षणाची शप्पथ घेतली. यावेळी भावूक होऊन ते म्हणाले, ‘जोपर्यंत हे रोप तुमच्यासोबत राहील, तोपर्यंत माझे वडील चंद्रशेखर साह हे तुमच्या आठवणीत राहतील.’

News18लोकमत
News18लोकमत

‘पर्यावरण रक्षणासाठी भरपूर झाडं लावण्याची आवश्यकता आहे. यासाठीच या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला एक फळझाड देऊन पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. खरंतर प्रत्येक श्राद्धप्रसंगी पितरांच्या स्मरणार्थ रोपलागवडीचा विधी व्हायला हवा’, असं रामबाबू यांनी यावेळी सांगितलं. ‘मनमोकळा श्वास घेतो भिजल्या….’ पहिला पाऊस पडताच कुशल बद्रिकेने शेअर केली रोमॅण्टिक पोस्ट दरम्यान, आता चंद्रशेखर साह यांच्या स्मरणार्थ समस्तीपूर आणि परिसरात पेरूच्या अनेक झाडांची लागवड होणार आहे. ज्यामुळे लोकांना काही वर्षांनी गोड फळं खायला मिळतील, सावली मिळेल, शुद्ध हवा मिळेल आणि पर्यावरणाचं संरक्षणही होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात