ग्वालियर, 15 मे : मध्यप्रदेशच्या ग्वालियर (Gwalior) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कुलैथ गावात रात्री उशिरा पती आणि पत्नीचे भांडण (Husband Wife Dispute) सुरू होते. मात्र, या भांडणाने एक वेगळेच वळण घेतले. मध्यरात्री पत्नी आपल्या मोबाईलवरुन कुणाशी तरी फोनवर बोलत होती. याच विषयावरुव पतीने पत्नीसोबत वाद घातला. तो पत्नीच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करू लागला. त्यांच्या या वादात त्यांच्या मुलानेही उडी घेतली. त्याने आपल्या वडिलांची बाजू घेत आपल्या आईवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या आईच्या हाताला लागली. यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तिघरा पोलिसांनी बाप-मुलावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या महिलेची प्रकृती बरी आहे. महिलेच्या माहेरी मध्यरात्री सुरू झाले भांडण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या मोतीझिल येथे राहणारा गजराज यादव पत्नी रेखा आणि मुलगा राज यादव यांच्यासह सासरी कुलैथ या गावी गेला होता. इथे आल्यानंतर शुक्रवारी रात्री त्याची पत्नी रेखा ही आपल्या मोबाईलवर दुसऱ्या कुणासोबत बोलत होती. यामुळे गजराज संतापला. तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करू लागला तसेच तिच्यासोबत भांडू लागला. मध्यरात्री सुरू असलेल्या या भांडणामुळे गजराजच्या सासरची मंडळी जागी झाली. तसेच त्याच्या मुलालाही जाग आली. दोन्ही पती-पत्नीमध्ये भांडण वाढतच गेले. यात त्यांच्या मुलानेही उडी घेतली. हेही वाचा - 13 वर्षांच्या मुलाने 1 वर्षाच्या मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वडिलांच्या अपमानाचा घेतला ‘असा’ बदला
त्याने आपल्या वडिलांचा पक्ष घेत त्याच्या आई रेखालाही तो बरे-वाईट बोलू लागला. यानंतर त्याने आईवर गोळी झाडली. उपस्थितांनी त्याच्याकडून बंदूक हिसकावली. तर त्याने झाडलेली गोळी त्याच्या आईच्या हाताला लागली. यानंतर रेखा यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून सूचना मिळाल्यानंतर तिघरा पोलीस यांनी एफआयआर नोंदवला आहे. रेखा यादव यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्यांचा मुलगा राज यादव आणि पती गजराज यादव याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.