मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Meghalaya IED blast : मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँग शहरात IED स्फोट

Meghalaya IED blast : मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँग शहरात IED स्फोट

मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँग शहरात IED स्फोट झाला आहे. संबंधित स्फोट हा पोलीस बाजार परिसरात झाला.

मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँग शहरात IED स्फोट झाला आहे. संबंधित स्फोट हा पोलीस बाजार परिसरात झाला.

मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँग शहरात IED स्फोट झाला आहे. संबंधित स्फोट हा पोलीस बाजार परिसरात झाला.

    शिलाँग, 30 जानेवारी : मेघालयची (Meghalaya) राजधानी असलेल्या शिलाँग (Shillong) शहरात IED स्फोट झाला आहे. संबंधित स्फोट हा पोलीस बाजार (Police Bazar) परिसरात झाला. या स्फोटामुळे नागरीक प्रचंड भयभीत झाले आहेत. सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. संबंधित स्फोट हा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे. शिलाँगमध्ये दिल्ली मिस्थान भंडार (Delhi Misthan Bhandar) प्रसिद्ध आहे. त्याच परिसरात हा स्फोट झाला आहे. या संपूर्ण स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी चर्चमध्ये गर्दी असते. त्याचाच फायदा घेऊन हा स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पण हल्ल्याची जबाबादारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. संबंधित घटना ही शिलाँगच्या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. शिलाँगमध्ये पोलीस बाजार ही एक कमर्शिअल इमारत आहे. तिथे दिल्ली मिस्थान भंडार आहे. हे भंडार प्रसिद्ध आहे. या स्फोटात या भंडारचं नुकसान झालेलं आहे. या स्फोटामुळे रस्त्यावर काही वस्तू उद्धवस्त झाल्याचं चित्र आहे. तसेच वाहनांचंही नुकसान झालं आहे. संबंधित घटनेमुळे बाजारातील सर्व दुकानं बंद करण्यात आले आहेत. परिसरात तातडीने बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून परिसराची पाहणी सुरु आहे. खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि रविवार निमित्ताने या भागातील अनेक दुकानं बंद होती. त्यामुळे सुदैवाने परिसरात फारशी गर्दी नव्हती. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत घटनेनंतर परिसरात नेमकी काय स्थिती आहे त्याचा अंदाज येतो. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेनंतर परिसरात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून लोकांना रोखलं. तिथे सर्वसामान्यांना जाण्यास बंदी घालण्यात आली. या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. (जिगरबाज कर्मचाऱ्याने आग विझवली, वसईच्या पेट्रोल पंपावर मोठा अनर्थ टळला) विशेष म्हणजे आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमावादावरुन तणाव सुरु असताना ही घटना समोर आली आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद आहे. या सीमावादवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांमध्ये नुकती बैठक पार पडली होती. या बैठकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा आणि दोन्ही राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या