Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

अख्खं गाव खेळत होतं होळी आणि चिमुरडी नराधमांशी लढत राहिली, रुग्णालयात सोडला जीव

अख्खं गाव खेळत होतं होळी आणि चिमुरडी नराधमांशी लढत राहिली, रुग्णालयात सोडला जीव

ती चिमुरडी आनंदाने होळी खेळत होती. इतरांना रंग लावण्यासाठी ती वडील व भावासह गावात गेली आणि काही वेळातच रंगाचा बेरंग झाला

ती चिमुरडी आनंदाने होळी खेळत होती. इतरांना रंग लावण्यासाठी ती वडील व भावासह गावात गेली आणि काही वेळातच रंगाचा बेरंग झाला

ती चिमुरडी आनंदाने होळी खेळत होती. इतरांना रंग लावण्यासाठी ती वडील व भावासह गावात गेली आणि काही वेळातच रंगाचा बेरंग झाला

  • Published by:  Meenal Gangurde

उन्नाव, 12 मार्च : उन्नावच्या बिहार पोलीस (Bihar Police) ठाण्यात होळीच्या (Holi) दिवशी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. मुलगी बेशुद्ध अवस्थेत गावच्या बाहेर आढळली तेव्हा परिसरात खळबळ उडाली.

मंगळवारी संध्याकाळी गावाबाहेर 400 मीटर अंतरावर मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. याबाबत माहिती मिळताच एसपी, एएसपीसह अनेक पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने तिला सीएचसी येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कानपूर येथे हलविण्यात आले आहे. कानपूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वडिलांच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमांवर बलात्कार आणि पोक्सोसह इतर कलमांअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संबंधित - पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

या प्रकरणात एसपीने चार टीमचे गठऩ केले असून त्यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली आहे. पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमधील रोष पाहून पोलीस व पीएसी बल तैनात करण्यात आलं आहे. सांगितलं जात आहे की, बिहार ठाणे क्षेत्रातील एका गावात मंगळवारी होळीच्या निमित्ताने काही नागरिक घराघरांमध्ये जाऊन शुभेच्छा देत होते. सर्वजण अत्यंत आनंदात होते. एकमेकांवर रंगाची उधळण करीत होते. दुपारी तीनच्या सुमारास हा जमाव त्याच गावचे रहिवासी असलेल्या माजी आमदारांच्या घराबाहेर पोहोचला. 9 वर्षांची मुलगी या गटात आपले वडील आणि भावासोबत होती. सर्वजण खूप दमले होते. वडिलांना पाणी पिण्याचं सांगून ती मुलगी काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर गेली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. सुमारे तासभर ती परतली नाही तेव्हा तपास सुरू झाला.

हे वाचा -  'तुझा मोबाईल देतो', म्हणत बलात्कार पीडितेवर पुन्हा बलात्कार; आरोपीला जन्मठेप

घरापासून जवळपास 400 मीटर लांब इंदेमऊला जाणाऱ्या मार्गावर प्राथमिक शाळेच्यामागील रस्त्याच्या किनाऱ्याजवळ मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. ते पाहून गावकऱ्यांनी याबाबत तिच्या कुटुंबीयांना सांगितले. तिच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खूणाही होत्या. याबाबत पोलिसांना सांगितल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर तातडीने मुलीला पोलीस ठाण्यात दाखल करण्य़ात आले. तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे पाहून कानपुर येथील रुग्णालयात तिला हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात तीन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

First published:

Tags: Child rape, POCSO Act