...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा

...तर 20 लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; कोरोनाच्या संकटात Unicef चा इशारा

त्यामुळे नागरिकांकडे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून जग कोरोनासारख्या महासाथीचा (coronavirus) सामना करीत आहे. काही देशांमध्ये शिथिल केलेलं लॉकडाऊन पुन्हा कडक केलं जात आहे. त्यात शाळादेखील पुढल्या वर्षी सुरू करण्याबाबत समर्थन दिलं जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर झाल्याची माहिती युनिसेफकडून (Unicef) दिली गेली आहे. पुढल्या वर्षात कोरोनाचा धोका कायम राहिल्यास एका पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे.

यासाठी युनिसेफने 140 देशांमध्ये पाहणी केली. या संशोधनानुसार सध्याच्या पिढीसमोर 3 प्रकारचे धोके दिसून आले आहेत. यामध्ये कोरोना महासाथीचा परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरीबी याशिवाय विषमतेचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियमित लसीकरण होत नाही. याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जर या आरोग्य सुविधा नियमित दिल्या गेल्या नाही तर 20 लाख मुलांचा पुढील 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तरुण पिढीची काम करण्याची क्षमताही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा-कोणी रस्त्यात बसून रडतयं, कोणाला पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं, पाहा इंदूरचा VIDEO

कोरोनाचा परिणाम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवा-सुविधांमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाच्या भीतीमुळे मुलांना नियमित तपासणी व लसीकरणासाठी घेऊन जाणं टाळलं जात आहे. दुसरीकडे बाह्यरुग्णांची केली जाणारी देखभाल, लहाम मुलांचा संसर्ग आणि गर्भवती महिलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाल्याची माहिती युनिसेफने दिली आहे.

दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दहा वर्षांच्या मुलाचे आतडे कोरोनामुळे सडल्याची दुर्मीळ समस्या समोर आली आहे. या दहा वर्षांच्या मुलाचे आतडे सडल्यामुळे त्याची अवस्था गंभीर होती, अखेर त्याच्या वडिलांनी त्यांचे 200 सेंटीमीटर लहान आतडे मुलांत ट्रान्सप्लॅंट केले. ओम घुले (10) असे या मुलाचे नाव असून, त्याच्यावर पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल उपचार सुरू होते. येथील डॉक्टरांनी असा दावा केला आहे की कोव्हिड-19मुळे छोटे आतडे ट्रान्सप्लॅंट करावे लागल्याची ही जगातील पहिली घटना आहे. 3 महिन्यात या मुलावर 4 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यासाठी तीन शहरांमध्ये त्याच्यावर उपचार झाले. डॉक्टरांच्या मते, या प्रकरणात कोरोना फॅक्टर SARS-CoV-2 ची अधिक तीव्रता दिसून आली.

Published by: Meenal Gangurde
First published: November 22, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading