अंताक्षरीनंतर स्मृती इराणींचा नवा उपक्रम, फोटो टाकून दिलं प्रात्यक्षिक

अंताक्षरीनंतर स्मृती इराणींचा नवा उपक्रम, फोटो टाकून दिलं प्रात्यक्षिक

लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या अंताक्षरीच्या उपक्रमात त्यांनी अनेकांना जोडून घेतले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 9 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Covid - 19) कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिक सजग राहण्याचं आवाहन केलं जात आहे. अनेक राज्यांनी नागरिकांना कायम मास्क (Mask) लावण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनापासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे या पर्यायांचा अवलंब करणं आवश्यक आहे.

लॉकडाऊनदरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी ट्विटर अंताक्षरी सुरू करीत त्यांनी अनेक सिनेकलाकारांना त्यात सहभागी करुन घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्या हाताने मास्क शिवत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण मदत म्हणून मास्क शिवत आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांचं अख्खं कुटुंब घरी मशिनवर मास्क शिवत असल्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते. मात्र मशिनशिवायही मास्क शिवता येऊ शकतो. यासाठी केवळ सूई- धाग्याच्या साहाय्याने मास्क कसा शिवायचा याचं प्रात्यक्षिक स्मृती इराणी यांनी आपल्या ट्विटरवर दिलं आहे.एका रुमालाच्या साहाय्याने त्यांनी हा मास्क शिवला आहे. फोटोंसह त्यांनी लिहिले आहे की, सूई-धाग्याच्या साहाय्यानेही रियुजेबल मास्क तयार केला जाऊ शकतो. त्यांच्या या पोस्टला खूप लाइक्स येत आहे. तर काहींनी त्यांच्या पोस्टवर काही मिम्सही टाकल्या आहेत.

संबंधित - आनंद महिंद्रांचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम, वाचून तुम्हीही कराल कौतुक

मुंबई पोलिसांचा बॉलिवूड अंदाज, अजय-सुनिलला दिलं त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर

 

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: April 9, 2020, 8:44 PM IST

ताज्या बातम्या