मुंबई पोलिसांचा बॉलिवूड अंदाज, अजयला सिंघम स्टाइल उत्तर तर सुनिल शेट्टीला म्हणाले- 'धडकन'मध्ये मुंबई शहर
लॉकडाऊनबाबत मुंबई पोलिसांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर ज्या-ज्या बॉलिवूड कलाकारांनी रिप्लाय दिला त्या सर्वांना मुंबई पोलिसांनी एकदम हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.
मुंबई, 09 एप्रिल : मुंबई पोलीस आपल्या कामात जसे तत्पर आहेत, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील तेवढचे सक्रीय आहेत. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओवर ज्या-ज्या बॉलिवूड कलाकारांनी रिप्लाय दिला त्या सर्वांना मुंबई पोलिसांनी एकदम हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.
जे लॉकडाऊनला कंटाळले आहेत त्यांच्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असणाऱ्या काही पोलिसांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत. यातून त्यांना किती मनापासून घरी राहायचं आहे, त्यांना कुटुंबाची किती आठवण येत आहे हे त्यांनी सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी या व्हिडीओला असं कॅप्शन दिलं आहे की, 'असं वाटतंय की लॉकडाऊन संपतच नाही आहे. कल्पना करा आम्ही घरी असतो तर काय काय केलं असतं.' मुंबई पोलिसांचा हा व्हिडीओ 5 लाखांहून अधिक ट्वीटर युजर्सनी पाहिला आहे.
सुनिल शेट्टीने मुंबई पोलिसांना हा व्हिडीओ पाहून 'हिरो' म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी यावर दिलेलं उत्तर खूप भन्नाट आहे आणि ते सुद्धा अगदी बॉलिवूड स्टाइलमध्ये!
अजय देवगणने सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर रिप्लाय देताना मुंबई पोलिसांनी 'सिंघम' आणि 'Once upon a time in Mumbai या चित्रपटांचा संदर्भ वापरला आहे. 'सर्व गोष्टी पूर्ववत करण्यासाठी 'खाकी'ने जे केलं पाहिजे ते आम्ही करत आहोत', अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Just doing what ‘Khakee’ is supposed to do to ensure that things return to how they were - ‘Once upon a time in Mumbai’! #TakingOnCoronahttps://t.co/iZzJNK6mPs
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra 🙏@CPMumbaiPolice@MumbaiPolice
मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे आभार मानले आहेत. रिचा चढ्ढा, अर्जून कपूर यांनी सुद्धा मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना याने तर चक्क मराठीमध्ये मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
We cannot thank the @MumbaiPolice enough in words! Still would like to appreciate the fact that they have been out there everyday, making sure everything goes smoothly and have always been there to protect us. A thank you from the bottom of our hearts! Stay safe. Jai Hind.
या व्हिडीओमध्ये पोलिसांनी ते जर घरी असते तर काय काय केलं असतं, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी मुलं, बायको, नवरा यांच्याबरोबर वेळ घालवला असता, पुस्तकं वाचली असती अशी उत्तर दिली आहेत. दरम्यान या सर्व गोष्टी आज घरी बसलेल्या प्रत्येकाच्या नशिबात आहे. प्रत्येकजण कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. मग लॉकडाऊन कधी संपणार याचा विचार न करता मिळालेला वेळेचा सदुपयोग करणं केव्हाही योग्य! निदान आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांसाठी तरी सर्वांना घरीच थांबणं बंधनकारक आहे.