मुंबई, 7 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. दिल्लीत निजामुद्दीन तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून त्यांचा शोध सुरू आहे. देशातील अनेक राज्य सरकारांनी तबलिगीच्या कार्यक्रमातून परतलेल्या नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमात परदेशातील नागरिकांचा सहभाग होता. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले इतर आणखी जणांच्या संपर्कात आल्याने कोरोना वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने यापूर्वीही दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमातून आलेल्यांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. त्यांची वेळीच तपासणी होणं आवश्यक आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मात्र तबलिगींच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेले तब्बल 50 ते 60 जणांनी आपला फोन स्विच ऑफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. या नागरिकांनी लपवण्यासाठी फोन स्विच ऑफ केल्याची शक्यता आहे. पोलीस यांचा शोध घेत असल्याचे राज्याच्या गृह मंत्रालयाने (Home Ministry) सांगितले. संबंधित - देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत या 10 जिल्ह्यांत; महाराष्ट्रात आहेत 2 हॉटस्पॉट संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

)







